मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

घरात आढळले एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड

घरात आढळले एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड

घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना सुखविंदर एका खोलीत पंख्याला लटकलेला दिसला, तर त्याची पत्नी, दोन मुले आणि आई-वडील बेशुद्ध अवस्थेत पडले होते.

घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना सुखविंदर एका खोलीत पंख्याला लटकलेला दिसला, तर त्याची पत्नी, दोन मुले आणि आई-वडील बेशुद्ध अवस्थेत पडले होते.

घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना सुखविंदर एका खोलीत पंख्याला लटकलेला दिसला, तर त्याची पत्नी, दोन मुले आणि आई-वडील बेशुद्ध अवस्थेत पडले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Haryana, India
  • Published by:  Kiran Pharate

चंदीगड 27 ऑगस्ट : हरियाणातील अंबाला येथील बलाना गावात 6 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी सापडलेल्या सुसाईड नोटवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत सुखविंदर सिंग यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यासोबतच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

अंबाला स्टेशन प्रभारी मुनीश शर्मा यांनी सांगितलं की, बलाना गावातून एका घरात 6 लोक मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना सुखविंदर एका खोलीत पंख्याला लटकलेला दिसला, तर त्याची पत्नी, दोन मुले आणि आई-वडील बेशुद्ध अवस्थेत पडले होते. सर्व लोकांना अंबाला शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

बहीण-भावाने एकत्र चहा घेतला आणि नंतर संपवलं आयुष्य, भाजप नेत्याच्या मुलांनी उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त केली आहे. यावरून असं समजतं की सुखविंदरने कुटुंबातील पाच जणांचा गळा दाबून हत्या केली आणि यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.

यमुनानगरच्या एका कंपनीत काम करणाऱ्या सुखविंदरने सुसाईड नोटमध्ये आरोप केला आहे की, कंपनीचे दोन अधिकारी त्याच्यावर 10 लाख रुपये देण्यास दबाव टाकत होते, ज्याची तो व्यवस्था करू शकत नव्हता. सुखविंदरने सुसाईड नोटमध्ये कंपनीच्या दोन्ही अधिकाऱ्यांची नावेही नमूद केली आहेत.

'जीवन हे सुंदर आहे, ते जगले पाहिजे' म्हणत 20 वर्षांच्या आरतीने वसतीगृहात घेतला गळफास, औरंगाबाद हादरलं

पोलीस उपाधिक्षक जोगिंदर सिंग यांनी सांगितलं की, कुटुंबातील पाच जणांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं दिसत असलं तरी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल. सुखविंदरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलं. सुखविंदरची मुलगी जस्सी तिसरीत शिकत होती तर धाकटी मुलगी आशू एलकेजीमध्ये होती.

सुखविंदर सिंग यांच्या नातेवाईकाच्या तक्रारीच्या आधारे, अंबाला शहरातील सदर पोलीस स्टेशनने यमुनानगरमधील एका वाहन विक्रेत्याशी संबंधित दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत

First published:

Tags: Murder, Suicide news