मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुलांची DNA टेस्ट करण्यास पत्नीचा नकार; सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून पतीची ट्रेनसमोर उडी

मुलांची DNA टेस्ट करण्यास पत्नीचा नकार; सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून पतीची ट्रेनसमोर उडी

या व्यक्तीला असा संशय होता, की त्याच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध आहेत. व्हिडिओमध्ये तो याचाच उल्लेख करताना दिसतो. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

  • Published by:  Kiran Pharate
पाटणा 16 जुलै : एक अतिशय धक्कादायक घटना मध्य प्रदेशाच्या इंदूरमधून समोर आली आहे. या घटनेत एका व्यक्तीने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या (Man Commits Suicide) केली. जीआरपीने गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवला. या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा आधी एक व्हिडिओही बनवला होता. यात त्याने आपली पत्नी या आत्महत्येसाठी (Suicide) कारणीभूत असल्याचं सांगितलं होतं. धक्कादायक! 8 वर्षात 14 वेळा गर्भपात, लिव्ह-इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महिलेचं टोकाचं पाऊल या व्यक्तीला असा संशय होता, की त्याच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध आहेत. व्हिडिओमध्ये तो याचाच उल्लेख करताना दिसतो. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना इंदूरच्या जीआरपी ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. इंदूर येथील राजेश पटेल यानी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडिओमध्ये राजेशने पत्नीवर आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये त्याने पत्नीशिवाय इतर लोकांवरही गंभीर आरोप केले आहेत. मृत व्यक्तीने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, त्याला संशय आहे की पत्नीची मुलंही त्याची नाहीत. त्याने पत्नीला डीएनए चाचणी करून घेण्यास सांगितलं असता तिने नकार दिला. यामुळे तो चिंतेत होता. व्हिडिओमध्ये त्याने म्हटलं आहे की, आता परिस्थिती अशी झाली आहे की त्याच्याकडे मरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यामुळेच तो आत्महत्या करत आहे. 'मैं बेवफा नही हूं...', तळहातावर लिहून महिला शिक्षिकेचं टोकाचं पाऊल जीआरपीचे एएसपी राकेश खाका यांनी सांगितलं की, ही घटना १३ जुलैची आहे. राजेश पटेल नावाच्या व्यक्तीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर मृताच्या नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
First published:

Tags: Crime news, Suicide news

पुढील बातम्या