मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /धक्कादायक, पोलीस स्टेशनच्या आवारातच गळफास घेऊन एकाची आत्महत्या

धक्कादायक, पोलीस स्टेशनच्या आवारातच गळफास घेऊन एकाची आत्महत्या

पोलीस स्टेशनच्या आवारातच एका व्यक्तीने आत्महत्या केली असताना कुणाचेच लक्ष कसे नव्हते? असा सवाल उपस्थितीत झाला आहे.

पोलीस स्टेशनच्या आवारातच एका व्यक्तीने आत्महत्या केली असताना कुणाचेच लक्ष कसे नव्हते? असा सवाल उपस्थितीत झाला आहे.

पोलीस स्टेशनच्या आवारातच एका व्यक्तीने आत्महत्या केली असताना कुणाचेच लक्ष कसे नव्हते? असा सवाल उपस्थितीत झाला आहे.

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 06 जानेवारी : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस ठाण्यात (Sindewahi police station) खळबळजनक घटना घडली असून, एका तक्रारकर्त्याने पोलीस ठाणे परिसरात असलेल्या शेडमध्ये गळफास ( commits suicide) घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळं पोलिसात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक राऊत ( वय 55)  असं मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वादामुळे ते त्रस्त होते. मंगळवारी रात्री घरात पुन्हा वाद झाला. त्यामुळे अशोक राऊत यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करून घरी परतले होते.

PNB Scam: नीरव मोदीच्या अडचणी वाढल्या; बहिण पूर्वी मोदी सरकारी साक्षीदार बनणार

पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर कारवाई होईल अशी अपेक्षा राऊत यांना होती.  पण अपेक्षित अशी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे नाराज झालेले राऊत पुन्हा  पहाटेच्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारातील पत्राच्या शेडखाली गळफास घेऊन आत्महत्या केली.

पती अंघोळ करत होता अन् चोर घुसले घरात, 20 तोळे सोने आणि दीड किलो चांदी केले साफ!1

मृतक अशोक राऊत हे सिंदेवाही इथल्या दसरा चौकातील वास्तव्यास होते. मागील काही दिवसांपासून ते कौटुंबिक कलहाने त्रस्त होते, अशी माहिती पुढे आली आहे. सध्या या घटनेवर भाष्य करायला पोलीस तयार नाहीत. परंतु, पोलीस स्टेशनच्या आवारातच एका व्यक्तीने आत्महत्या केली असताना कुणाचेच लक्ष कसे नव्हते? असा सवाल उपस्थितीत झाला आहे.

First published: