मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /महिला डॉक्टरने मॅट्रिमोनिअल साइटवर तरुणाला पाठवले खासगी फोटो, नंतर घडला धक्कादायक प्रकार

महिला डॉक्टरने मॅट्रिमोनिअल साइटवर तरुणाला पाठवले खासगी फोटो, नंतर घडला धक्कादायक प्रकार

कबीर सिंग हा बॉलिवूड चित्रपट पाहिल्यानंतर इव्हेंट कंपनी चालवणारा आरोपी ब्लॅकमेलर बनला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

कबीर सिंग हा बॉलिवूड चित्रपट पाहिल्यानंतर इव्हेंट कंपनी चालवणारा आरोपी ब्लॅकमेलर बनला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

कबीर सिंग हा बॉलिवूड चित्रपट पाहिल्यानंतर इव्हेंट कंपनी चालवणारा आरोपी ब्लॅकमेलर बनला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

नवी दिल्ली, 30 मे : दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं मॅट्रिमोनिअल साइटद्वारे महिलांशी मैत्री व ब्लॅकमेल करणार्‍या फसव्याला पकडलं आहे. कबीर सिंग हा बॉलिवूड चित्रपट पाहिल्यानंतर इव्हेंट कंपनी चालवणारा आरोपी ब्लॅकमेलर बनला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. खरंतर मुंबई, दिल्ली सारख्या मोठा शहरांमध्ये प्रत्येकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतो. पण यात सिनेक्षेत्रात काम करण्यासाठी येणाऱ्या महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या असतील, असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मॉडेल होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका स्मार्ट तरुणीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मॅट्रिमोनिअल साइटवर बनावट खातं तयार केलं. त्यानंतर मुलींना लग्नाची खात्री पटवून देत त्यांना ब्लॅकमेल करून महिलांचे खासगी फोटो मिळवले. आरोपींना हाय-प्रोफाइल महिला आणि तरुणींना लक्ष्य करायचा.

मुंबईवर दुहेरी संकट, कोरोनानंतर हवामान खात्याच्या अंदाजाने चिंता वाढवली

एका महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला त्याच्या एका साथीदारासह अटक केली. स्वत: हाडांचा डॉक्टर असल्याचं वर्णन करून आरोपीने डेटिंग अ‍ॅपवर आपलं प्रोफाइल बनवलं होतं. सायबर सेलनुसार आरोपीने आतापर्यंत अनेक मुली आणि महिलांना ब्लॅकमेल केलं आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये गाझियाबाद इथला रहिवासी आनंद कुमार आणि त्याचा मित्र प्रियांम यादव यांचा समावेश आहे.

महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून अटक

सायबर सेलचे डीसीपी डॉ. अनेश राय यांनी सांगितलं की, एका महिला डॉक्टरने डॉ. रोहित गुजराल नावाच्या व्यक्तीशी डेटिंग अ‍ॅपद्वारे मैत्री केल्याची तक्रार दिली. त्याने तिच्याशी लग्न करण्यास सांगून जवळीक वाढवली. आरोपीने सोशल मीडियावरून काही खासगी फोटो आणि व्हिडिओ शोधले. नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पीडितेने नकार दिल्यास आरोपीने तिची छायाचित्रे सार्वजनिक करण्याची धमकी दिली आणि 30,000 रुपये घेतले.

पहिल्यांदा कोरोनासंबंधी आली चांगली बातमी, उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा घटला

लाजपत नगर मेट्रो स्थानकाजवळ आरोपींना केली अटक

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी लाजपत नगर मेट्रो स्टेशनजवळ पाळत ठेवून आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याचा साथीदारही त्याच्या जागी पकडला गेला. यापूर्वीही अनेक महिलांनी आरोपीविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

पुण्यात कोरोनाला कसं आवरणार? 24 तासांत मोठ्या संख्येनं वाढले पॉझिटिव्ह रुग्ण

First published: