मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

चिडलेल्या बापाची मुलाला अमानुष मारहाण, तक्रारीनंतर पोहोचला तुरुंगात; VIDEO पाहून येईल संताप

चिडलेल्या बापाची मुलाला अमानुष मारहाण, तक्रारीनंतर पोहोचला तुरुंगात; VIDEO पाहून येईल संताप

मुलाने नातेवाईकांच्या घरी दंगा केला याचा राग अनावर होऊन त्याला जनावराप्रमाणे (Man beats his son with sugarcane mother files complaint) उसाने मारहाण करणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Published by:  desk news

हैद्राबाद, 30 नोव्हेंबर: मुलाने नातेवाईकांच्या घरी दंगा केला याचा राग अनावर होऊन त्याला जनावराप्रमाणे (Man beats his son with sugarcane mother files complaint) उसाने मारहाण करणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली आहे. मुलाने पाहुण्यांच्या घरी दंगा केल्याबद्दल शिक्षा म्हणून (Beaten after complaint by relatives) त्याला अमानूष मारहाण करण्यात आली. शिवाय मुलाच्या बहिणीला या घटनेचा व्हिडिओदेखील त्याने शूट करायला सांगितला.

मावशीने केली तक्रार

हैद्राबादमध्ये राहणाऱ्या या कुटुंबातील मुलाचा त्याच्या मावशीकडे सोडण्यात आलं होतं. मावशीने मुलाच्या वडिलांना फोन केला आणि मुलगा त्रास देत असल्यामुळे त्याला घेऊन जाण्याची विनंती केली. या प्रकारामुळे वैतागलेल्या बापाने मुलाला ओढत ओढत घरी आणलं. घरातील एक जाडजूड ऊस घेऊन त्याला मारहाण करायला सुरुवात केली.

मुलीने केले शूटिंग

मुलाला मारहाण करण्यापूर्वी मुलीच्या हातात मोबाईल देत या घटनेचं रेकॉर्डिंगही करायला सांगितलं. त्यानंतर मुलाला त्याने अमानूषपणे मारहाण करायला सुरुवात केली. मुलगा जिवाच्या आकांताने ओरडत होता आणि आपल्याला मारहाण न करण्याची विनंती करत होता. शूटिंग करणारी त्याची बहीणदेखील काकुळतीला येऊन आपल्या भावाला सोडून देण्याची विनंती तिच्या वडिलांना करत होती. मात्र वडिलांनी मारहाण सुरूच ठेवली. त्याच्या पाठीवर, पोटावर, मांडीवर, पायावर, घोट्यावर अशा सर्व ठिकाणी त्याने मारहाण केली. जीवाच्या आकांताने विव्हळणाऱ्या मुलाची त्याला बिलकूल दया येत नसल्याचं या व्हिडिओत दिसतं. काही वेळाने ऊसदेखील तुटला. मात्र तरीदेखील बापाचा राग शांत झाला नाही.

हे वाचा- ..अन् पठ्ठ्याने थेट पत्नीच्या किडनीचाच केला सौदा; पतीचा प्रताप वाचून व्हाल हैराण

आईने केली तक्रार

हा प्रकार लक्षात आल्यावर मुलाच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अशोक घंटे असं आरोपीचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनीदेखील हा व्हिडिओ शेअर केला असून आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Father, Hyderabad, Police, Son, Video viral