मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आमंत्रणाशिवाय लग्नात जेवल्याची चुकवावी लागली मोठी किंमत; व्यक्तीने गमावला जीव

आमंत्रणाशिवाय लग्नात जेवल्याची चुकवावी लागली मोठी किंमत; व्यक्तीने गमावला जीव

या घटनेत एका व्यक्तीला काठ्या आणि रॉडने मारहाण करण्यात आली. कारण हा व्यक्ती आमंत्रणाशिवायच एका लग्नात जेवण्यासाठी पोहोचला होता. या बेदम मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू झाला आहे

या घटनेत एका व्यक्तीला काठ्या आणि रॉडने मारहाण करण्यात आली. कारण हा व्यक्ती आमंत्रणाशिवायच एका लग्नात जेवण्यासाठी पोहोचला होता. या बेदम मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू झाला आहे

या घटनेत एका व्यक्तीला काठ्या आणि रॉडने मारहाण करण्यात आली. कारण हा व्यक्ती आमंत्रणाशिवायच एका लग्नात जेवण्यासाठी पोहोचला होता. या बेदम मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू झाला आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 04 डिसेंबर : माणुसकीला काळिमा फासणाऱ्या काही घटना दररोज समोर येत असतात. या घटनांबद्दल ऐकूनही संताप येतो. अशीच एक घटना आता दिल्लीमधून समोर आली आहे. यात आमंत्रणाशिवायच एका लग्नात जेवण्यासाठी पोहोचलेल्या एका व्यक्तीला लोकांनी भयानक शिक्षा दिली. राजधानी दिल्लीतील दक्षिण-पूर्व जिल्ह्यातील सरिता विहार परिसरात ही घटना घडली.

या घटनेत एका व्यक्तीला काठ्या आणि रॉडने मारहाण करण्यात आली. कारण हा व्यक्ती आमंत्रणाशिवायच एका लग्नात जेवण्यासाठी पोहोचला होता. या बेदम मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. लग्नातील या जेवणासाठी व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. मृत व्यक्तीचं नाव कौशल मुखिया असून तो 50 वर्षाचा होता.

आमंत्रणाशिवायच लग्नात जेवायला गेला; MBA च्या विद्यार्थ्याला मिळालेली शिक्षा पाहून संताप येईल

मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंटवाले कौशलच्या ओळखीचे होते. त्यांना भेटण्यासाठी अनेकदा कौशल लग्नांमध्ये तसंच पार्टीमध्ये जात असे. मृतक कौशल हे आपल्या कुटुंबीयांसोबत दिल्लीच्या सरिता विहार परिसरात राहात होते. शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ते फिरण्यासाठी घराबाहेर पडले. यानंतर ते आली विहार पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचले.

इथे पोहोचल्यावर वरातीतील लोकांनी त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आणि यात समजलं की ते आमंत्रण न मिळताच लग्नात पोहोचले आहेत. याच कारणावरुन कौशल आणि या लोकांमध्ये वाद सुरू झाला. यानंतर त्यांनी काठीने कौशल यांना बेदम मारहाण केली. यानंतर गंभीर जखमी झालेल्या कौशल यांना इथून बाहेर काढण्यात आलं. घटनेनंतर दोन तरुण कौशलच्या घरी पोहोचले आणि याबाबत माहिती दिली. कौशल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

बायकोला ट्रॅक्टर चालवायला शिकवणं नवऱ्याला पडलं महागात; दुर्घटनेचा Video Viral

भोपाळमधील तरुणालाही मिळालेली शिक्षा -

भोपाळमध्येही एका लग्न समारंभारत विना आमंत्रणाचं गेलेल्या एका MBA च्या विद्यार्थ्याला चक्क भांडीच धुवावी लागली. ही शिक्षा त्याला फ्रीमध्ये जेवण केल्याने मिळाली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला. यानंतर हा व्हिडिओ अपलोड करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली गेली. व्हिडिओमध्ये दिसतं, की एक तरुण भांडी साफ करत आहे. तर व्हिडिओ बनवणारा व्यक्ती त्याला प्रश्न विचारत आहे. तुला प्लेट धुवून कसं वाटत आहे? असा प्रश्न तो करतो.यावर हा युवक म्हणतो, की मोफत जेवण केलं आहे, मग काहीतरी तर करावंच लागेल. यानंतर व्हिडिओ बनवणारा व्यक्ती त्याला इतरही प्रश्न विचारतो.

First published:

Tags: Crime news, Shocking news