मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दारू पार्टीदरम्यान मित्राची हत्या; मुंबई एअरपोर्टच्या यूनियन ऑफिसमधील धक्कादायक प्रकार

दारू पार्टीदरम्यान मित्राची हत्या; मुंबई एअरपोर्टच्या यूनियन ऑफिसमधील धक्कादायक प्रकार

पोलिसांनी सांगितलं की, रविवारी रात्री 50 वर्षीय अब्दुल शेख आणि इतर काही लोक भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या केंद्रीय कार्यालयात बसून दारू पीत होते. यावेळी अचानक काहीतरी कारणावरुन इथे वाद सुरू झाला

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 09 ऑगस्ट : मुंबईमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुंबईतील सांताक्रूझ येथे एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी सांगितलं की सांताक्रूझ येथील एव्हिएशन युनियनच्या कार्यालयात एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. हा व्यक्ती दारू पार्टीमध्ये सहभागी झाला होता. अंधाऱ्या रात्री ट्रॉली बॅगेत प्रियकराचा मृतदेह अन् शेजारी पोलीस वॅन; महिलेचा क्रूर चेहरा उघड पोलिसांनी सांगितलं की, रविवारी रात्री 50 वर्षीय अब्दुल शेख आणि इतर काही लोक भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या केंद्रीय कार्यालयात बसून दारू पीत होते. यावेळी अचानक काहीतरी कारणावरुन इथे वाद सुरू झाला. अब्दुल शेख बचावासाठी मध्ये आले असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला. तो जोरजोरात ओरडत राहिला; दाढी ठेवली म्हणून मारहाण, आई-मुलाचे अंतर्वस्त्र काढून... सांताक्रूझ पोलिसांनी सांगितलं की, अब्दुल शेख हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे कर्मचारी होते. निखिल शर्मा नावाच्या 30 वर्षीय व्यक्तीने त्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी निखिल उर्फ ​​कपिल याला पोलिसांनी अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, याठिकाणी दारू पार्टी सुरू होती. यावेळी निखिलचं तिथे असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीसोबत भांडण झालं. ही भांडणं सोडवण्यासाठी अब्दुल शेख मध्ये आले. मात्र निखिलने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला. आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत .
First published:

Tags: Crime news, Murder

पुढील बातम्या