Home /News /crime /

कुत्रा भुंकल्याने भडकला व्यक्ती; श्वानाच्या मालकासह तिघांना लोखंडी रॉडने जबर मारहाण, VIDEO

कुत्रा भुंकल्याने भडकला व्यक्ती; श्वानाच्या मालकासह तिघांना लोखंडी रॉडने जबर मारहाण, VIDEO

रविवारी (3 जुलै 22) सकाळी धरमवीर दहिया हे फिरायला गेले होते. त्यावेळेस तिथले स्थानिक रहिवासी रक्षित यांचा पाळीव कुत्रा दहिया यांच्यावर भुंकला

नवी दिल्ली 05 जुलै : संतापाच्या भरात लोक काहीही करू शकतात. त्यामुळेच रागावर नियंत्रण ठेवावं असं म्हटलं जातं. अशाच रागाच्या भरात दिल्लीमध्ये एक भयानक घटना घडली आहे. दिल्लीत शेजाऱ्याचा कुत्रा भुंकला म्हणून एका व्यक्तीनं त्या कुत्र्यावर आणि तीन जणांवर लोखंडी रॉडनं हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण आणि हा कुत्रा गंभीर जखमी झालेत. दिल्लीतील पश्चिम विहारमधील (Paschim Vihar) ही घटना आहे. झी न्यूजच्या वेबसाईटवर याबद्दल वृत्त देण्यात आलं आहे. पुण्यात दिवसा घरफोडी करुन 60 तोळे सोन्याची चोरी; बहिणीच्या घरात फ्रिजखाली लपवले दागिने, अशी झाली पोलखोल रविवारी (3 जुलै 22) सकाळी धरमवीर दहिया हे फिरायला गेले होते. त्यावेळेस तिथले स्थानिक रहिवासी रक्षित यांचा पाळीव कुत्रा दहिया यांच्यावर भुंकला (Dog Barks). याचा राग येऊन दहियाने या कुत्र्याच्या शेपटीला धरून उचललं आणि त्याला जमिनीवर फेकून दिलं, असं पोलिसांनी सांगितल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. कुत्र्यावर हल्ला झालेला पाहताच त्याचा मालक रक्षित त्याला वाचवायला आला. तेव्हा धरमवीर दहियाने मालकालाही मारायला सुरुवात केली. हे कुत्रं धरमवीरला चावलं असं सांगितलं जात आहे. याच गोष्टीवरून दोन तरुणांमध्येही किरकोळ हाणामारी झाली. त्यानंतर दहिया लोखंडी रॉड (Iron Rod) घेऊन आला आणि त्यानं कुत्र्याच्या डोक्यावर तो रॉड मारला. त्यानंतर परत एक वाद झाला. तेव्हा चिडलेल्या दहियाने रक्षित आणि त्याच्या कुटुंबातील एका महिलेलाही या रॉडने मारहाण केली. या भांडणात मध्यस्थी करणारा दुसरा शेजारी हेमंत यालाही दहियाने लोखंडी रॉडने मारहाण केली असं सांगितलं जात आहे. या सगळ्या जखमींची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काय? महेश बाबूच्या भावाला बायकोनं चपलेनं मारलं! VIDEO होतोय व्हायरल कुत्र्याचा मालक रक्षितच्या जवाबावरून पश्चिम विहारच्या पूर्व भागातील पोलीस स्टेशनमध्ये कलम 308 ( विनाकारण खुनाचा प्रयत्न), 323 (स्वत:हून जखमी करण्याची शिक्षा), 341 (दंड) च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ANI या न्यूज एजन्सीने दिली आहे. तर प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 नुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम 451 आणि 451 (घरगुती अत्याचारासाठी तुरुंगवासाची शिक्षा) आणि 451 (घरगुती अत्याचार) ही कलमेही लावण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास आता सुरु आहे आणि यातील सत्यता तपासली जात आहे. पण या घटनेने सध्या दिल्लीतील पश्चिम विहारमधील रहिवाशांना मात्र धक्का बसला आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Crime news, Shocking video viral

पुढील बातम्या