मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

डॉक्टरही झाले चकित! 4 गोळ्या लागल्यानंतरही महिलेनं 28 किमी चालवली गाडी

डॉक्टरही झाले चकित! 4 गोळ्या लागल्यानंतरही महिलेनं 28 किमी चालवली गाडी

जमीन बळकावण्याच्या हेतूनं महिलेवर झाडल्या एकामागोमाग 6 गोळ्या.

जमीन बळकावण्याच्या हेतूनं महिलेवर झाडल्या एकामागोमाग 6 गोळ्या.

जमीन बळकावण्याच्या हेतूनं महिलेवर झाडल्या एकामागोमाग 6 गोळ्या.

  • Published by:  Akshay Shitole
चंदिगड, 18 जानेवारी: शरीरात चार गोळ्या घुसल्या असतानाही रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत महिलेन 28 किलोमीटर गाडी चालवून रुग्णालय गाठल्यानं हॉक्टरही हैराण झाले. त्यांनी तातडीनं महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतलं. हा धक्कादायक प्रकार चंदिगडमधील मुक्तसर तालुक्यातील सम्मेवाली गावातील आहे. डॉक्टरांना या महिलेची जगण्याची जिद्द पाहून हैराण झाले. 4 गोळ्या शरीरात लागलेल्या असतानाही रक्तबंबाळ अवस्थेत ही महिला घरापासून दूर 28 किलोमीटर कार चालवत थेट रुग्णालयात पोहोचली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकड़ून आरोपीचा शोध सुरू आहे. नेमकं काय आहे प्रकरण ज्या महिलेला गोळ्या लागल्या त्याचं नाव सुमीत कौर आहे. त्या चंदिगडमधील छोट्या गावात राहतात. तलाक झाल्यानंतर त्या माहेरी वडिलांकडे राहण्यासाठी आल्या. त्यांच्या आईची 40 एकर जमीन आहे. या जमिनीच्या वादातून सुमीत कौर आणि त्याच्य़ा भावात वारंवार जमिनीवरून खटके उडत होते. मंगळवारी संध्याकाळी हरिंदर सिंह त्यांचा भाऊ घरी आला त्याने आईला चहा करायला सांगितला. आई चहा करायला गेल्याचं पाहताच त्यानं सुमीत यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्यातली एक गोळी डोक्याला तर दुसरी गळ्याला लागली. त्या एकदम भानावर आल्या. त्य़ांच्या भावानं 6 गोळ्य़ा झाडून अख्ख रिव्हॉल्वर रिकामं केलं होतं आणि तो तिथून फरार झाला. त्यांची आई जमिनीवर कोसळली. हेही वाचा-ktm duke वरून कॉलेजला चालले होते मित्र, वाहनाच्या धडकेत 20 वर्षीय तरुण जागीच ठार सुमीत कौर यांनी रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत आपल्या आईला उचलून गाडीत घातलं आणि उपचारासाठी रुग्णालयाच्या दिशेनं गाडी सुसाट वेगानं पळवली. आधीच 4 गोळ्या लागल्यामुळे स्वत: सुमीत कौर यांच्य़ा शरीरातून रक्त वाहात होतं. तशाच अवस्थेत त्यांनी रुग्णालय गाठल्यानं डॉक्टरही हा सगळा प्रकार पाहून अचंबित झाले. त्यानी तात्काळ दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतलं. दरम्यान ही घटना जमिनीच्या वादातून घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. हेही वाचा-मुंबईत कॉन्स्टेबलने केला टॅक्सी चालकावर बलात्कार, कारण आहे 'रेड लाईट एरिया'
First published:

Tags: Crime

पुढील बातम्या