बंगळुरु, 12 डिसेंबर : बेळगावमधून (Belgaum) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चर्चमध्ये (Charch) एक व्यक्ती धारदार तलवार (Sword) घेऊन आतमध्ये शिरला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हा तरुण चर्चमध्ये उपस्थित असलेले फादर फ्रांसिस डिसूजा यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आला होता. यावेळी डिसूजा हे आपला जीव वाचविण्यासाठी चर्चमधून बाहेर पळत आले. तर तो तरुणही त्यांच्या पाठीमागे धावला. त्याने काही अंतरापर्यंत फादर डिसूजा यांचा पाठलाग केला. त्यानंतर तो तिथून पळून गेला. विशेष म्हणजे या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे.
संबंधित घटना घडल्यानंतर तातडीने पोलिसांना फोन करुन याबाबतची माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन नेमकं काय घडलं याची चौकशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी परिसरात तपास केला होता. तसेच चर्चमध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले होते. त्यातून संबंधित घटनेचं गांभीर्य समोर आलं. ही घटना शनिवारी (11 डिसेंबर) घडली होती. घटनेंतर पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर चारही बाजूंनी सुरक्षा दिली होती. पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध सुरु आहे.
A man with sword enters into Catholic Church in Belagavi and escapes. @siddaramaiah @DCP_LO_Belagavi pic.twitter.com/GhxdOKewlS
— Shreyas HS (@shreyas_ToI) December 11, 2021
संबंधित घटनेमुळे कर्नाटक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा संबंध कर्नाटक सरकार येत्या अधिवेशनात धर्मांतराविषयी जे विधेयक मांडणार आहे थेट त्याच्याशीच असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. कारण या विधेयकावर चर्चमध्ये झालेल्या चर्चेत चिंता व्यक्त करण्यात आली होती.
हेही वाचा : कल्याणमधील धक्कादायक घटना, घरात सापडला सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह
कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज एम बोम्मई यांनी सप्टेंबर महिन्यात 30 हिंदू धर्मगुरुंसोबत बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर त्यांनी राज्यात धर्मांतराविरोधात एक कायदा आणला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार अभ्यास करत आहे, असं सांगितलं होतं. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसने विरोध केला आहे.
दुसरीकडे बंगळुरुचे आर्कबिशप पीटर मचाडो यांनी मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांना पत्र लिहून धर्मांतराबद्दलचा कायदा न आणण्याची विनंती केली आहे. पूर्ण ख्रिस्ती समाज हा धर्मांतरण विरोधी विधेयकाला विरोध करत आहे, असं ते पत्रात म्हणाले आहे. त्यांनी संविधानाच्या कमल 25 आणि 26 चा दाखला देत अल्पसंख्यांक समुदायाच्या अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं पत्रात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.