मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'पाणघोडा समजून महिलेवर झाडल्या गोळ्या'; आरोपीचा कोर्टात अजब दावा, काय आहे प्रकरण?

'पाणघोडा समजून महिलेवर झाडल्या गोळ्या'; आरोपीचा कोर्टात अजब दावा, काय आहे प्रकरण?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

दक्षिण आफ्रिकेच्या लिम्पोपो प्रांतातील पॉल या शेतकऱ्याने एका जोडप्यावर गोळीबार केला. त्याला याचं कारण विचारलं असता गेंडा असल्याचं समजून या जोडप्यावर गोळ्या झाडत होतो, असं उत्तर त्याने दिलं.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 06 मे : आजच्या काळात जगातील अनेक भागांमध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. असं असूनही लोक मौजमजेसाठी शिकारीला बाहेर पडतात. पण या नादात प्राण्याऐवजी माणसाचा बळी गेला तर? दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या पॉल हेंड्रिक्सवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या लिम्पोपो प्रांतातील पॉल या शेतकऱ्याने एका जोडप्यावर गोळीबार केला. त्याला याचं कारण विचारलं असता पाणघोडा असल्याचं समजून या जोडप्यावर गोळ्या झाडत होतो, असं उत्तर त्याने दिलं. आपण ज्याच्यावर गोळ्या झाडतोय, तो पाणघोडा नसून माणूस आहे हे त्याला माहीत नव्हतं (Man Shot Black Woman Mistaken for Hippo). पोटच्या मुलाला त्याच्या वाढदिवशीच संपवले! 'या' धक्कादायक कारणामुळे आईच्या नात्याला फासला काळीमा 77 वर्षीय पॉल यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी माणसाला पाणघोडा समजल्याचं स्पष्टीकरण दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, पॉलने रामकोन लिन्ह आणि त्याच्या पत्नीवर ते मासेमारी करत असताना गोळीबार केला. दोघेही नदीजवळ मासेमारीत व्यग्र होते. तेवढ्यात दुरून कोणीतरी त्यांच्यावर गोळीबार करायला सुरुवात केली. या हल्ल्यात लिन्ह यांच्या पत्नीला गोळी लागली. तर तिच्या पतीला लपण्यासाठी जागा मिळाली, त्यामुळे तो वाचला. यानंतर पतीने पोलिसांना घटनास्थळी बोलावलं. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जेव्हा त्यांनी पॉलला अटक केली तेव्हा त्याने सांगितलं की तो पाणघोडा आणि माकडाची शिकार करतो. यासाठी त्याला अटक करता येणार नाही. नंतर, पोलिसांनी त्याला सांगितलं की तो ज्याला पाणघोडा म्हणून गोळ्या मारत होता ती एक आफ्रिकन स्त्री होती. जी त्याच्या गोळीने जखमी झाली आहे. पॉलला अटक करताना पोलिसांनी त्याच्याकडून दोन रायफल, एक रिव्हॉल्व्हर, एक पिस्तूल आणि दोन एअरगन जप्त केल्या. सेल्फीकरता बुरखा हटवाल तर... मुस्लीम संघटनांचा महिलांविरोधात अजब फतवा पोलिसांनी अटक केल्यानंतर पॉलला न्यायालयात हजर केले. तिथेही त्याने तिच गोष्ट सांगत स्वतःला निर्दोष सांगितलं. न्यायालयाने त्याला सुमारे पाच हजार रुपयांच्या दंडानंतर जामीन मंजूर केला. यासोबतच या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. हे वांशिक भेदभावाचंही प्रकरण असू शकतं, असा न्यायालयाला संशय आहे. कदाचित इंग्रज असलेल्या पॉलने जाणूनबुजून या जोडप्याला लक्ष्य केलं असावे. तपासानंतर पुढील सुनावणी घेण्याचं ठरलं आहे.
First published:

Tags: Gun firing, Shocking news

पुढील बातम्या