मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

टॉयलेटमध्ये लपून कपलचे प्रायव्हेट व्हिडिओ करायचा शूट; बिंग फुटलं अन् जाळ्यात अडकला युवक

टॉयलेटमध्ये लपून कपलचे प्रायव्हेट व्हिडिओ करायचा शूट; बिंग फुटलं अन् जाळ्यात अडकला युवक

कपलसाठी खास सुट्टी

कपलसाठी खास सुट्टी

कार्तिकनं एका रूममध्ये अंघोळ करणाऱ्या आणि शारीरिक संबंध ठेवत असलेल्या कपलचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. दोन दिवसांनी हे कपल पुन्हा इथे परतेल यासाठी तो तिथेच थांबून त्यांची वाट पाहू लागला.

    सिंगापूर 18 ऑगस्ट : एका 30 वर्षाच्या व्यक्तीनं सार्वजनिक शौचालयात शारीरिक संबंध (Sexual Relation) ठेवणाऱ्या कपलचा व्हिडिओ (Couple Video) बनवला. ही बाब समोर आल्यानंतर या व्यक्तीला सोमवारी 17 आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुप्पुसामी यानं अशाच प्रकारचे आपले तीन गुन्हे मान्य केले आहेत. यानंतर या व्यक्तीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. भर रस्त्यावर तरुणाची हत्या केली अन् चेहऱ्यावर केली लघुशंका, औरंगाबादमधील घटना ही घटना बिशन-आंग मो कियो पार्कमधील एका सार्वजनिक शौचालयातील आहे. यात कार्तिकनं एका रूममध्ये अंघोळ करणाऱ्या आणि शारीरिक संबंध ठेवत असलेल्या कपलचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. दोन दिवसांनी हे कपल पुन्हा इथे परतेल यासाठी तो तिथेच थांबून त्यांची वाट पाहू लागला. कार्तिकनं आपल्या फोनमध्ये तीन व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि त्यांचे चार ते पाच नग्न फोटोही (Nude Photos) क्लिक केले. यात या कपलचा चेहराही अगदी स्पष्ट दिसत होता. कोरोनाला घाबरून जोडप्यानं संपवलं जीवन; मृत्यूआधी पोलिसांना पाठवला भावनिक मेसेज 19 नोव्हेंबर 2020 मध्ये तो या पार्कमध्ये परत आला आणि पुन्हा एका वेगळ्या शौचालयात जात त्यानं तीन व्हिडिओ बनवले. यातील एका व्हिडिओमध्ये एक अज्ञात महिला शौचालयात जाताना दिसली. नंतर एका 22 वर्षीय व्यक्तीनं आरोपीला पकडलं आणि पोलिसांना (Police) बोलावलं. या व्यक्तीनं सांगितलं की आरोपी त्याच्या प्रेयसीला आपत्तीजनक अवस्थेत पाहत होता. यानंतर पोलिसांनी कार्तिकला अटक केली आणि त्याचा फोन जप्त केला. तपासात त्याच्या फोनमध्ये आधीचे इतर व्हिडिओही समोर आले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Viral news

    पुढील बातम्या