रायपूर, 4 जानेवारी: आपल्या विवाहित प्रेयसीला (Married girlfriend) तिच्या घरातून पळवून नेणाऱ्या (Run away) तरुणानं काही दिवसांनी तिच्या मुलीलाही (Daughter) पळवून नेल्याची (Kidnap) घटना उघडकीला आली आहे. लग्नापूर्वीपासून ज्या तरुणीवर प्रेम होतं, तिच्यासोबत तरुणाचा लग्नानंतरही संपर्क होता. दोघांनी मिळून घरातून पळून जाण्याचा निर्णय़ घेतला. त्यानंतर महिलेच्या मुलीचंही त्यांनी अपहरण केल्याचं समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
छत्तीसगडमधील एका विवाहित महिलेचं सूरज वर्मा याच्यासोबत अफेअर सुरू होतं. दोघांनी पळून जाऊन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. विवाहितेला एक मुलगी होती. मात्र तिला पतीकडेच सोडून तिची आई प्रियकरासोबत पळून गेली होती. दोघं घरापासून काही अंतरावर दूर राहत होते आणि एकमेकांशी लग्न करण्याच्या बेतात होते. मात्र या काळात महिलेला तिच्या मुलीची आठवण येऊ लागली आणि ती वारंवार आपल्या प्रियकराकडे मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त करू लागली.
आखला अपहरणाचा डाव
आपल्या मुलीला काहीही करून आपल्याकडे घेऊन यावं, असा हट्ट महिलेनं सूरजकडं धरला. त्यानंतर सूरजनं मुलीचं अपहरण करण्याचा कट रचला. आपल्या दोन मित्रांना त्याने सोबत घेतलं. त्यापैकी एक अल्पवयीन होता. तिघांनी मिळून मुलीच्या घराच्या परिसराची रेकी केली आणि मुलीच्या अपहरणाची योजना आखली. एक दिवस संधी साधून मुलीला बाईकवर बसवून ते तिच्या आईकडे घेऊन आले.
हे वाचा-मुलाने सुपारी देऊन केला वडिलांचा खून, नाराजीचं कारण ऐकून येईल संताप
पोलिसांनी लावला शोध
आपली मुलगी संध्याकाळपर्यंत घरी न आल्यामुळे तिच्या वडिलांच्या कुटुंबीयांनी अगोदर आसपासच्या परिसरात तिचा शोध घेतला आणि नंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. पळून गेलेली पत्नी आणि तिचा प्रियकर यांच्यावर आपला प्राथमिक संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी दोघांचा शोध घेत मुलीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं. मुलीला पुन्हा तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं असून तिची आई आणि प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Boyfriend, Crime, Daughter, Girlfriend, Jharkhand, Police, Women extramarital affair