मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

महात्मा गांधींच्या पणतीला 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, 62 लाखाच्या फसवणुकीचा आरोप

महात्मा गांधींच्या पणतीला 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, 62 लाखाच्या फसवणुकीचा आरोप

दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पणतीला फसवणूकीच्या आरोपाखाली तुरूंगात पाठवण्यात आले आहे. 56 वर्षांच्या आशिष लता रामगोबिन यांना 60 लाख रुपयांची फसवणूक केली आहे

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 08 जून : दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पणतीला फसवणूकीच्या आरोपाखाली तुरूंगात पाठवण्यात आले आहे. 56 वर्षांच्या आशिष लता रामगोबिन यांना 60 लाख रुपयांची फसवणूक आणि धोका दिल्याप्रकरणी डर्बन कोर्टाने सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सोमवारी कोर्टाने निकाल दिला ज्यामध्ये आशिष लता रामगोबिन यांना दोषी ठरविण्यात आले. स्वत: ला व्यावसायिक म्हणून घेत लताने स्थानिक व्यावसायिकाकडून 62 लाख रुपये हडपले. फसवणूक झालेल्या झालेल्या एसआर महाराजांनी सांगितले, की लता यांनी नफ्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. उद्योजक एसआर महाराज यांच्या फसवणूकीचा आरोप लता यांच्यावर झाला होता. महाराजांनी लताला एक माल आयात करण्यासाठी व सीमाशुल्क देण्यासाठी 60 लाख रुपये दिले होते. लता यांनी आश्वासन दिले होते, की या नफ्यातील काही भाग त्या एसआर महाराजांना देणार. देशात 26/11 सारख्याच दहशतवादी हल्ल्याची शक्यता! NIA ला बंगालमधून आला धमकीचा फोन प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची मुलगी लता रामगोबिन यांना डर्बन स्पेशलाइज्ड कमर्शियल क्राइम कोर्टाने आरोपी सिद्ध झालेलं आणि शिक्षा या दोन्हीविरोधात अपील करण्यासाठी परवानगी नाकारली होती. सोमवारी सुनावणीदरम्यान कोर्टाला सांगण्यात आले की लता रामगोबिन यांनी ऑगस्ट 2015 मध्ये न्यू आफ्रिका अलायन्स फुटवेअर डिस्ट्रीब्यूटर्सचे संचालक महाराज यांची भेट घेतली होती. महाराज यांची कंपनी कपडे, लिननचे कपडे आणि चपलांची आयात, निर्मिती आणि विक्री करते. त्यांची कंपनी इतर कंपन्यांना प्रॉफीच शेअरच्या आधारावर पैसेही देते. लता रामगोबिन यांनी महाराजांना सांगितलं, की त्यांनी दक्षिण अफ्रिकी रुग्णालय ग्रुप नेटकेयरसाठी लिननच्या कपड्यांचे तीन कंटेनर आयात केले आहेत. तिनं यासाठीच्या सीमाशुल्कासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगत स्वतःची सही असलेला खरेदीच्या ऑर्डरचा पुरावा पाठवला आणि महाराजकडून 62 लाख रुपये घेतले. मात्र, महाराज यांना नंतर समजलं की ही कागदपत्रे बनावट आहेत आणि त्यांना लता यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
First published:

Tags: Financial fraud, Mahatma gandhi

पुढील बातम्या