मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दोन घटनांनी महाराष्ट्र हादरलं! पतीसोबत वाद, 2 चिमुकल्यांना विष पाजलं आणि...

दोन घटनांनी महाराष्ट्र हादरलं! पतीसोबत वाद, 2 चिमुकल्यांना विष पाजलं आणि...

त्रासाला कंटाळून पोटच्या दोन मुलांना संपवल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन घटनांमुळे महाराष्ट्र हादरला असून मोठी खळबळ उडाली आहे.

त्रासाला कंटाळून पोटच्या दोन मुलांना संपवल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन घटनांमुळे महाराष्ट्र हादरला असून मोठी खळबळ उडाली आहे.

त्रासाला कंटाळून पोटच्या दोन मुलांना संपवल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन घटनांमुळे महाराष्ट्र हादरला असून मोठी खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Kranti Kanetkar

औरंगाबाद : त्रासाला कंटाळून पोटच्या दोन मुलांना संपवल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन घटनांमुळे महाराष्ट्र हादरला असून मोठी खळबळ उडाली आहे. या वेगवेगळ्या घटनांमुळे परिसरात हळहळ देखील व्यक्त केली जात आहे. पहिल्या घटनेत आईसह दोन मुलांनी विष घेऊन आयुष्य संपवलं आहे.

पतीसोबत होणाऱ्या भांडणाला कंटाळून पत्नीने आपल्या मुलांसोबत टोकाचं पाऊल उचललं. रोजच्या त्रासाला कंटाळून तिने रागाच्या भरात दोन मुलांना उंदीर मारण्याचं औषध दुधात मिसळून दिलं. एवढंच नाही तर तिनेही ते घेतल्यानं खळबळ उडाली आहे.

सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव इथे ही धक्कादायक घटना घडली. दोन्ही मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर महिलेवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पती-पत्नीमध्ये मोबाईलवरून भांडण झाल्याची माहिती मिळाली आहे. मला बाबांशी बोलायचं आहे फोन द्या असं तिने आपल्या पतीला सांगितलं. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

हेही वाचा-एका प्रेमाची भयानक गोष्ट! पत्नीनं सोडलं मावस बहिणीशी जवळीक वाढली पण नातं आड आलं...अन् प्रेमाचा भयावह THE END

पतीने मोबाईल देण्यास नकार दिल्याने खटके उडाले. भांडण विकोपाला गेलं आणि रागाच्या भरात पत्नीने मुलांसोबत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दुसरी घटना चंद्रपुरातील वरोरा भागात घडल्याची माहिती मिळाली आहे. एका घरात दोन चिमुकले आढळले आहेत. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. तर त्यांचे वडील फरार असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत वडिलांनीच या दोन मुलांना विष पाजून त्यांच्या हत्येचा कट केल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा-अल्पवयीन मुलाने आईचा हातोड्याने खून करून पेटीत कोंबला मृतदेह; एक बकरी ठरली हत्येचं कारण

या चिमुकल्यांना विष दिल्यानंतर त्यांचा गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता अशी माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. दोन्ही मुलांना वडिलांनी शाळा सुटल्यावर घरी आणलं आणि विष पाजलं. घराला कुलूप लावून ते पसार झाले. घरी आई जेव्हा कुलूप उघडून आली तेव्हा मुलांच्या तोंडातून फेस येत असल्याचं दिसलं.

आईनं दोन्ही मुलांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या मुलांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. संजय कांबळे असं संशयित आरोपीचं नाव आहे. तो फरार असून पोलीस तपास सुरू आहे.

First published:

Tags: Aurangabad, Chandrapur, Crime news