मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दोन दिवसांपासून ACB चे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे अचानक गायब; जालन्यात एकच खळबळ

दोन दिवसांपासून ACB चे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे अचानक गायब; जालन्यात एकच खळबळ

दोन दिवसांपासून ACB चे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे अचानक गायब; जालन्यात एकच खळबळ

दोन दिवसांपासून ACB चे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे अचानक गायब; जालन्यात एकच खळबळ

एसीबीचे पोलीस निरीक्षक दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासन आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

जालना, 4 फेब्रुवारी: जालना (Jalna) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे (ACB Police Inspector Sangram Tate missing) हे बुधवारी (2 फेब्रुवारी) रात्रीपासून बेपत्ता आहेत. पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एसीबीचे पोलीस अधीक्षक हे शहरात दाखल झाले आणि त्यांनी शहरात दिवसभर चौकशी केली आहे. संग्राम ताटे यांना बुधवारीच पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती, त्यांची कोकण विभागात पदोन्नतीवर बदली झाली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहरातील यशवंतनगर भागातील राहत्या घरातून आपल्या मति्राला भेटण्यासाटी जातो असे पत्नीला सांगून घराबाहेर पडले होते. घराबाहेर जाताना त्यांनी कोणतेही वाहन, मोबाईल फोन आणि खिशातील वॉच पाकीटही सोबत नेलेले नाही.

सीसीटीव्ही फूटेज तपासणी

याबाबत माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे औरंगाबादचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे हे गुरुवारी दिवसभर जालना शहरात ठाण मांडून होते. एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे. ज्या ठिकाणी संग्राम ताटे हे गेले होते त्या ठिकाणचे आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.

वाचा : 60 दिन में पैसा डबल; आमिष दाखवून 560 दिव्यांगांना लावला कोट्यवधींचा चुना

पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल

पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांचा दोन दिवसांपासून त्यांचा कोणाशीही संपर्क झालेला नाही. यासंदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात मिसिंगची गुरुवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून नोंद करण्यात आली आहे.

2 हजारांची नोट खाली पडल्याचं सांगत व्यापाऱ्याचे 9 लाख लांबवले

चोरट्यांनी एका व्यापाराला चांगलेच गंडवल्याचा प्रकार जालन्यातून समोर आला आहे. तुमचे दोन हजार रुपये पडल्याचं सांगत व्यापाऱ्याला रोखलं आणि त्यानंतर व्यापाऱ्याकडे असलेली पैशांनी भरलेली बॅग घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे

2 हजार रुपयांच्या नादात एका कापूस व्यापाऱ्याला तब्बल 9 लाख रुपयांची झळ सोसावी लागली. हा प्रकार बदनापूर मार्गावरील धोपतेशवर फाट्यावर घडला. जनार्दन चपटे असं या पीडित व्यापाऱ्याचे नाव असून त्याने जालन्यातील एचडीएफसी बँकेतून शेतकऱ्यांना देण्यासाठी 9 लाख रुपये काढले होते.

First published:

Tags: Cctv footage, Crime, Mumbai, Mumbai police, Police, महाराष्ट्र