संतापजनक! ठाण्यात शेफनं 20 वर्षीय तरुणीवर केला बलात्कार, Instagramवर शेअर केला अश्लील फोटो

संतापजनक! ठाण्यात शेफनं 20 वर्षीय तरुणीवर केला बलात्कार, Instagramवर शेअर केला अश्लील फोटो

एका 22 वर्षीय तरुणाला बलात्काराच्या आरोपीखाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तरुणावर 20 वर्षीय तरुणीवर बलात्काराचा केल्याचा आरोप आहे.

  • Share this:

ठाणे, 15 ऑक्टोबर : एका 22 वर्षीय तरुणाला बलात्काराच्या आरोपीखाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तरुणावर 20 वर्षीय तरुणीवर बलात्काराचा केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्यानं पीडित तरुणीचे अश्लील फोटो इंटरनेटवर व्हायरल केल्याचंही म्हटलं जात आहे. ही धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा उत्तराखंडातील टिहरी गढवाल जिल्ह्यातील रहिवासी आहे. व्यवसायानं तो शेफ असून त्याचं नाव  गुरुचरण प्रीतम साहा असं आहे. ठाण्यातील एका हॉटेलमध्ये तो काम करत होता.

(वाचा : आईची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या)

लॉजमध्ये तरुणीवर केला बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच आरोपीनं इंग्रजी भाषा शिकण्यासाठी शहरातील एका शिकवणीमध्ये प्रवेश घेतला होता. येथे एका 20 वर्षीय तरुणीसोबत त्याची ओळख झाली. या तरुणीला त्यानं लग्नाचं आमिष दाखवून तिला एका लॉजवर नेलं आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. यानंतर चित्रविचित्र अवस्थेतील तिचे फोटो काढले, अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगेल यांनी दिली

(वाचा : कॉलेजच्या पहिल्याच दिवशी 28 विद्यार्थ्यांना विवस्त्र करून घेतली 'ओळखपरेड')

इन्स्टाग्रावर पोस्ट केला तरुणीचा आक्षेपार्ह फोटो

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगेल यांनी पुढे असंही सांगितलं की, आरोपीनं तरुणीचे आक्षेपार्ह फोटो तिचा भाऊ आणि मित्रांना इन्स्टाग्रावर पाठवले. यानंतर तरुणीनं गेल्या आठवड्यात गुरुचरणविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. चौकशीदरम्यान पोलिसांनी आरोपीला शनिवारी उत्तराखंडातून अटक केली. सध्या याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.

(वाचा : बहिणींनी आईची हत्या करून मृतदेह फेकला तलावात, गावकऱ्यांनी दिला चोप)

मोबाईलची चोरी करणाऱ्या तरुणाला कपडे फाटेपर्यंत धुतला, VIDEO VIRAL

Published by: Manoj Khandekar
First published: October 15, 2019, 2:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading