घृणास्पद! अपहरण करून महिलेवर बलात्कार, गुप्तांगावर दिले सिगरेटचे चटके

घृणास्पद! अपहरण करून महिलेवर बलात्कार, गुप्तांगावर दिले सिगरेटचे चटके

माणुसकीला काळीमा! पहिल्या पतीकडून महिलेवर बलात्कार, विष पाजून साधला जीवे मारण्याचा डाव.

  • Share this:

रतलाम, 09 ऑक्टोबर: मध्य प्रदेशातील रतलाममध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घृणास्पद घटना समोर आली आहे.आलोट पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये विवाहित महिलेचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिच्या गुप्तांगावर सिगरेटचे चटके देऊन विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित महिला रस्त्यावर सापडली असून अत्यावस्थ स्थितीत असल्यानं तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार महिलेच्या पहिल्या पतीसह त्यांच्या साथीदारांनी केल्याची बाब तपासात समोर आली आहे. पोलिसांनी पहिल्या नवऱ्यासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

तलाकनंतरही पहिल्या नवऱ्याकडून छळ

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार महिन्याभराआधी तिला आरोपीने तलाक दिला होता. त्यानंतर महिलेनं दुसरं लग्न केलं. आरोपीने पीडितेच्या नवऱ्याला मारहाण केल्याचा आरोपही केला आहे. त्याचा साक्षीदार पीडित असल्यानं हे प्रकरण पोलिसात न नेण्यावरून पीडितेला धमक्या आणि त्रास दिला जात होता. मात्र हा सगळा प्रकार पोलिसांना सांगण्यावर ठाम राहिल्यानं पहिल्या नवऱ्यानं याचा राग मनात ठेवला आणि पीडितेला धडा शिकवण्यासाठी संधी शोधू लागला.

पहिल्या नवऱ्याच्या दोन भाच्यांनी केला बलात्कार

सोमवारी महिला कपडे शिवण्यासाठी जात असताना रस्त्यात पहिल्या नवऱ्यानं आपली बहिण आणि दोन भाच्यांच्या मदतीनं पीडितेचं अपहण केलं. त्यानंतर पीडितेला त्यांच्या शेतात घेऊन जाण्यात आलं. आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी दारू पार्टी केली आणि त्यानंतर पीडितेवर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. पीडितेनं पोलिसात जावू नये तिने जबाब बदलावा यासाठी तिचा छळ करण्यात आला. पीडित महिला तिच्या निर्णयावर ठाम राहिल्यानं तिच्या गुप्तांगावर सिगरेटचे चटके देण्यात आले. पहिल्या नवऱ्याला राग अनावर झाल्यानं त्याने पीडितेला जबरदस्ती किटकनाशक पाजून रस्त्यावर फेकून देण्यात आली आणि त्यानंतर आरोपी फरार झाले.

Loading...

रतलाम जिल्हा रुग्णालयात पीडितेवर उपचार

स्थानिकांना रस्त्यावर महिला बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानं त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. स्थानिकांनी याबाबत पोलिसात माहिती दिली. पीडितेची अवस्था अत्यावस्थ असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. रतलामच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसरा आरोपींवर अपहरण करणं, महिलेचा छळ, मारहाण यासोबत इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीसह साथिदारांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणात सामिल असलेल्या महिलेचा शोध अद्याप सुरू आहे.

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 08:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...