भयंकर! महिलेनं 25 वेळा चाकूनं सपासप केला वार, पोलीस ठाण्यात फोन लावून सांगितलं...
भयंकर! महिलेनं 25 वेळा चाकूनं सपासप केला वार, पोलीस ठाण्यात फोन लावून सांगितलं...
कांलिदी गोल्डमध्ये राहणारी अंशू लग्नाच्या एक महिन्यापूर्वीपर्यंत आरोपी पती हर्ष शर्मा याच्या कंपनीत काम करीत होती. यादरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं व ऑगस्ट महिन्यात दोघांनी आर्य समाजातील मंदिरात लग्न केलं. तो जावरा कंपाऊंडमधील हर्ष शर्मा याच्या घरात राहत होती.
'हॅलो! पोलीस स्टेशन...मी एका बलात्कार करणाऱ्याला ठार केलं'
भोपाळ, 17 ऑक्टोबर : एका महिलेनं आपल्यावर जबरदस्ती करणाऱ्या तरुणाला शिक्षा दिली आहे. त्याचा कायमचा काटा काढून चांगलाच धडा शिकवल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ब्लॅकमेलिंगला कंटाळून या महिलेनं एका व्यक्तीला संपवलं आणि पोलीस ठाण्यात फोन करून धक्कादायक माहिती सांगितली.
या व्यक्ती दुष्कर्म आणि ब्लॅकमेलिंगला वैतागून महिलेनं थेट एक दोन नाही तर 25 वेळा चाकूनं सपासप वार केले. त्यानंतर पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती आणि गुन्ह्याची कबुली दिली. ही थरारक घटना मध्य प्रदेशातील गुना या परिसरात घडली आहे. पोलिसांना हत्येची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
2005 पासून तरुण तिच्यावर सतत बलात्कार करत असल्याचा आरोप महिलेने केला. त्यावेळी ही महिला अल्पवयीन होती. त्यावेळेपासून हा व्यक्ती महिलेला सतत ब्लॅकमेल करून बलात्कार करत असल्याचा गंभीर आरोप या महिलेनं केला. अखेर रागातून महिलेनं त्याला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस तपासात मृता व्यक्तीचं नाव ब्रिज भूषण शर्मा असल्याची माहिती मिळाली आहे.
हे वाचा-VIDEO: सुसाट कारची जोरदार धडक आणि ट्रॅक्टरचे झाले तुकडे; थोडक्यात वाचला चालक
महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार 16 वर्षांची असल्यापासून ब्रिजभूषण शर्मानं तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर या युवकाने अनेक वेळा तिला धमकावून जबरदस्ती केली. अखेरीस त्या महिलेचे शिक्षकाशी लग्न झाले जेणेकरुन ब्रिजभूषण तिच्यापासून दूर जाईल. लग्नानंतर या महिलेला एक मुलगीही झाली पण तरीही ब्रिजभूषणने मात्र तिची पाठ सोडली नाही.
या पीडित महिलेला सतत धमक्या देऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत राहिला. घटनेच्या रात्री ही महिला घरी एकटी होती, त्यावेळी ब्रिजभूषण रात्री तिच्या घरी आला. नशेत असलेल्या ब्रिजभूषणने पीडितेवर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. पीडितेचा संयम सुटला आणि तिने धारदार चाकूने त्यावर 25 वार केले. जीव गेला हे पटेपर्यंत महिला त्या व्यक्तीवर सतत वार करत राहिली आणि अखेर तिने पोलीस ठाण्यात फोन लावून 'हॅलो! पोलीस स्टेशन...मी एका बलात्कार करणाऱ्याला ठार केलं' अशा माहिती पोलिसांना दिली.
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.