घरात घुसून थेट हत्या करायचा, पोलिसांच्या चकमकीत खतरनाक सीरियल किलर ठार

घरात घुसून थेट हत्या करायचा, पोलिसांच्या चकमकीत खतरनाक सीरियल किलर ठार

गुजरामधील दाहोदमध्ये 2017 साली झालेली दोन हत्या प्रकरणं आणि 2009 मधील रतलाम बलात्कार प्रकरणातही दिलीप आरोपी होता.

  • Share this:

भोपाळ, 4 डिसेंबर :  उत्तर प्रदेशातील विकास दुबे (Vikas Dubey) एनकाउंटर (Encounter)  आणि हैदराबाद एनकाउंटरच्या (Hyderabad encounter) घटना गेल्या वर्षभरात देशात मोठ्या प्रमाणात गाजल्या. या एनकाउंटरच्या आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका राज्यात एनकाउंटरची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेश,तेलंगणा पाठोपाठ आता मध्य प्रदेशातील रतलाम पोलिसांनी (Ratlam Police) शहरातील बहुचर्चित तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी दिलीप देवलचे एनकाउंटर केले आहे. गुरुवारी रात्री शेतामध्ये झालेल्या एनकाउंटरमध्ये दिलीप जागीच ठार झाला. यावेळी झालेल्या चकमकीत 5 पोलीस जखमी झाले आहेत.

100 वेळा चाकूने भोसकलं, धडापासून डोकं केलं वेगळं; पोटच्या लेकीने केली आईची हत्या

आरोपीने चालवली पहिली गोळी

या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीपने आत्मसमर्पण करावं असं आवाहन पोलिसांनी केले होते. त्यावेळी त्याने ते आवाहन धुडकावून लावत पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांना आत्मसंरक्षणासाठी गोळीबार करावा लागला. या गोळीबारात आरोपी दिलीप ठार झाला. यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून यामध्ये दोन सब इन्सपेक्टरचा समावेश आहे. सर्व जखमींना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

तिहेरी हत्याकांडाचा आरोपी

रतलाममध्ये आठवडाभरापूर्वी झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा दिलीप मुख्य आरोपी होता. गुजरातमधील दाहोद जिल्ह्याचा रहिवाशी असलेला दिलीपने तीन साथीदारांच्या मदतीने रतलाममधील एका सलून चालक परिवाराच्या घरात पहिल्यांदा चोरी केली. त्यानंतर या चोरीचा कोणताही पुरावा शिल्लक राहू नये यासाठी त्याने घरातील तीन्ही व्यक्तींना ठार मारले. ऐन देव दिवाळीच्या रात्री झालेल्या या हत्याकांडाने रतलामसह संपूर्ण मध्य प्रदेशात खळबळ उडाली होती.

दिलीप होता अट्टल गुन्हेगार!

रतलाममधील तिहेरी हत्याकांडापूर्वी देखील गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये दिलीपवर गुन्ह्यांची नोंद आहे. गुजरामधील दाहोदमध्ये 2017 साली झालेली दोन हत्या प्रकरणं आणि 2009 मधील रतलाम बलात्कार प्रकरणातही दिलीप आरोपी होता.

शीतल आमटेंच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोलिसांसमोर उभं राहिलं मोठं आव्हान

दिलीपने गुजरातमधील दोन व्यापाऱ्यांच्या नावाने बनावट ओळखपत्रंही तयार केली होती. त्याचबरोबर दाहोदमधील एका व्यापाऱ्याच्या हत्या प्रकरणात त्याला आजन्म जन्मठेप झाली होती. दिलीपला या प्रकरणी 2019 साली पॅरोल मिळाला होता.

पॅरोलवर बाहेर आल्यानंतरही दिलीपच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच होत्या. अखेर रतलाम पोलिसांनी त्याचा एनकाउंटरमध्ये खात्मा केला आहे.

Published by: News18 Desk
First published: December 4, 2020, 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading