गुंडांच्या हाणामारीचा भयानक VIDEO, थेट कुटुंबियांवरच चालवल्या तलवारी

गुंडांच्या हाणामारीचा भयानक VIDEO, थेट कुटुंबियांवरच चालवल्या तलवारी

वाढदिवसा दिवशीच कुटुंबियांवर अज्ञात गुंडांचा तलवार आणि काठ्यांनी हल्ला, भयानक हल्ल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद

  • Share this:

भोपाळ, 24 फेब्रुवारी : जुलूस घेऊन जात असणाऱ्या कुटुंबावर शनिवारी रात्री उशिरा काही अज्ञातांना हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. वाढदिवसाचा जल्लोष साजरा करण्यात मश्गुल असणाऱ्या या कुटुंबावर लक्ष्मण अहिरवार आणि त्यांच्या नातेवाईकांवर काही गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी जुलूसमधील वस्तूंची तोडफोड केली. या प्रकरणी मोती नगर पोलीस स्थानकाचे प्रभारी सतीश सिंह यांनी मुख्य आरोपी सोनू घोसी यांच्यासह अन्य अज्ञात हल्ला करणाऱ्या काही तरुणांना अटक केली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

मातोनगर परिसरात गुंड सोनी घोसी आणि त्यांच्या काही साथीदारानी जुलूसवर तलवारी आणि काठीने हल्ला केला. सोनी घोसीचं नाव दारू माफियांसोबतही जोडलं जातं. मध्य प्रदेशातील सागर शहरात शनिवारी रात्री अनुसूचित जातीच्या एका कुटुंबावर जुलूसदरम्यान हा हल्ला करण्यात आला. हल्ल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेही वाचा-'ट्रम्प यांच्या जाण्यानंतर आम्ही ऐकणार नाही' भाजप नेत्याचा पोलिसांना अल्टिमेटम

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीनं तोडफोड आणि या कुटुंबावर हल्ला केला गेला आहे ते. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सोनी घोसीसह त्याच्या साथीदारांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. काही आठवड्यांपूर्वी सागर जिल्ह्यात एका अनुसूचित जातीच्या युवकाची जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती. धन प्रसाद याच्या हत्येचा आरोप अल्पसंख्यांक असलेल्या समुदायावर करण्यात आला होता. त्यामुळे जातीतून हा वाद उफाळला का? त्यातून शनिवारी पुन्हा हल्ला करण्यात आला का? या दोन्ही हल्ल्याचा एकमेकांसोबत काही संबंध आहे का? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे.

हेही वाचा-'आमच्या फाशीची शिफारस करा', लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणातील निलंबित पोलिसाचे पत्र

First published: February 24, 2020, 8:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading