मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! मुलींना फसवण्यासाठी ‘त्यानं’ फेसबुकवर टाकले आर्मी युनिफॉर्ममधील खोटे फोटो

धक्कादायक! मुलींना फसवण्यासाठी ‘त्यानं’ फेसबुकवर टाकले आर्मी युनिफॉर्ममधील खोटे फोटो

आर्मीमध्ये (Army) भरती होण्यास अपात्र ठरल्यानंतर आरोपी हौस म्हणून आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये फिरत असे, त्यानंतर त्यानं त्यानं बनावट युनिफॉर्मचा वापर फसवणुकीचे ( Cheating) प्रकार करण्यासाठी सुरु केला.

  • Published by:  News18 Desk
भोपाळ, 30 डिसेंबर : सोशल मीडियाचा (Social Media) वापर करुन फसवणूक करण्याचे प्रकार कमी नाहीत. पैशांची फसवणूक करणारे (Money cheaters) तसेच महिलांच्या मागे रोमियोगिरी करत फिरणारे मंडळी त्यांचे उद्देश साध्य करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याचे अनेक प्रकार आजवर उघड झाले आहेत.  अभासी (Virtual) जगात खोट्या प्रोफाईलचा (Fake Profile) वापर करत मुलींची फसवणुक करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी व्यक्ती फेसबुकसह (Facebook) अन्य सोशल मीडियावर स्वत:चे आर्मी युनिफॉर्ममधील बनावट फोटो टाकत असे. काय आहे प्रकरण? मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळ पोलिसांनी (Bhopal Police) आर्मी इंटेलिजन्सच्या (Army Intelligence )  सूचनेनुसार या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी शहरातल्या चुनाभट्टी भागात आर्मी युनिफॉर्ममध्ये फिरत होता. आरोपी तरुणाचे नाव संदीप कुमार दीक्षित असे असून तो मध्य प्रदेशातील पन्ना या शहरातला आहे. संदीप फेसबुकसह अनेक सोशल मीडिया साईट्सवर आर्मी युनिफॉर्ममध्ये स्वत:चे फोटो पोस्ट करत होता. मुलींना जाळ्यात अडकवण्यासाठी तो हे प्रकार करत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. भोपाळमधल्या एका तरुणीने फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तपास यंत्रणा या तरुणाच्या मागावर होत्या. आर्मीमध्ये भरती होण्यास अपात्र ठरल्यानंतर संदीप हौस म्हणून आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये फिरत असे, त्यानंतर त्यानं त्यानं बनावट युनिफॉर्मचा वापर फसवणुकीचे प्रकार करण्यासाठी सुरु केला. संदीपच्या तपासणीच्या दरम्यान त्याच्याकडं अवैध चाकू आणि मिल्ट्री युनिफॉर्म सापडला आहे. या ‘बनावट आर्मी मॅन’नं किती जणींची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Madhya pradesh

पुढील बातम्या