छिंदवाडा, 5 डिसेंबर : मासे पकडण्यासाठी सोबत जाण्यास पत्नीनं नकार दिला आणि त्यातून झालेल्या वादातून पतीनं धक्कदायक पाऊल उचललं आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. पत्नीनं मासेमारीसाठी सोबत जाण्यास नकार दिला म्हणून पतीनं वाद घातला. हा वाद टोकाला गेल्यानं पतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यानं पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं. सर्वात धक्कादायक बाबा म्हणजे यामध्ये पत्नी गंभीर होरपळल्यानं तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं.
उपचारासाठी दाखल करण्यात आलेली पीडित पत्नी अर्ध्याहून अधिक भाजल्यानं तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली. पत्नीने मासेमारीसाठी एकत्र जाण्यास नकार दिल्यानं पतीने तिला मारहाण केली आणि नंतर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. ही घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहे.
छिंदवाडा इथल्या तामिया पोलीस ठाण्याच्या परिसरातील डेलखरी गावची ही खळबळजनक घटना आहे. नवा मोहल्ला येथे राहणारी बलि कहार याची पत्नी गोमतीबाईसोबत रात्री खूप वाद झाला आणि त्यावरून पतीच्या डोक्यात राग गेला.
हे वाचा-साताऱ्यात साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, कामगाराचा होरपळून मृत्यू
यांचा पत्नी गोमतीबाई कहार (वय 40) यांच्याशी वाद झाला. तो पत्नीबरोबर वादात भांडतही असे. गुरुवारी मासेमारीवरून दोघांमध्ये वाद झाला. पतीनं आपल्या पत्नीला एकत्र मासेमारीसाठी जाण्यास सांगितले असता तीने नकार दिला आणि त्यानंतर पतीनं हे टोकाचं उचललं आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तिथे पोहोचले.
अर्ध्याहून अधिक भाजलेल्या अवस्थेत पत्नी तडफडत होती. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी आणि तपास सुरू आहे. पतीविरोधात कलम 302 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.