केकच्या बहाण्यानं वडिलांनी 8 वर्षांच्या मुलाची नदीत बुडवून केली हत्या

केकच्या बहाण्यानं वडिलांनी 8 वर्षांच्या मुलाची नदीत बुडवून केली हत्या

मुलीच्या वाढदिवसाचा केक आणण्याच्या बहाण्यानं वडिलांनी 8 वर्षांच्या मुलाला सोबत नेलं.

  • Share this:

बालाघाट, 30 मे : मुलीच्या वाढदिवसाचा केक आणण्यासाठी गेलेल्या वडिलांनी पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाढदिवशी चांगलं सरप्राइज मिळण्याऐवजी भाऊ गेल्याचं दु:ख नशीबी आलं. मध्य प्रदेशातील बालाघाट परिसरातील हा भयंकर प्रकार समोर आला आहे.

8 वर्षांच्या मुलाचे दोन्ही हात बांधून वैनगंगा नदीत बुडवून हत्या केली आहे. हत्येनंतर वडिलांनी पहिलं घर गाठलं. पोटच्या मुलाची हत्या केल्याचं कुटुंबीयांना सांगून त्यांनी स्वत: पोलिसांच्या स्वाधीन केलं.

मुलीच्या वाढदिवसाचा केक आणण्याच्या बहाण्यानं त्यांनी लहान मुलाला सोबत नेलं आणि वाटेत वैनगंगा नदीत दोन्ही हात बांधून त्याला बुडवून मारल्याची कबूली पोलिसांनी दिली आहे. कोतवाली टी आय विजय परस्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुनील जायस्वाल नावाच्या व्यक्तीनं आपल्या पोटच्या मुलाल संपवलं. आधीच काम नाही, बेरोजगार असल्यानं वंश संपवण्यासाठी हे धक्कादायक पाऊल उचललं असल्याचं आरोपीनं कबुली दिली.

हे वाचा-ग्रामपंचायत कार्यालयात अधिकाऱ्यांची रंगली मद्यपार्टी; अशी झाली पोलखोल

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत तर मजुरांना आणि कामगारांना काम मिळत नाही. अनेक उद्योगांवर गदा आल्यानं बेरोजगारी वाढली आहे. आधीच हातात काम नाही त्यामुळे खूप ताण होता. परिणामी वंश संपवण्याचा निर्णय वडिलांनी घेतला आणि आपल्या पोटच्या मुलाला संपवलं. या प्रकरणी आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून जायस्वाल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हे वाचा-शिवसेना नेत्याच्या हत्येमागे भाजप नेत्याचा होता हात, 4 आरोपींनी केली अटक

हे वाचा-सेवानिवृत्तीला अवघे 3 दिवस शिल्लक, कोरोना योद्धानं गमावला जीव तर एक कामावर परतला

संपादन- क्रांती कानेटकर

First Published: May 30, 2020 12:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading