दुहेरी हत्येचा थरार! श्वानाला फिरवायला गेली तरुणी, बॉयफ्रेंडनं केली आई-वडिलांची हत्या

दुहेरी हत्येचा थरार! श्वानाला फिरवायला गेली तरुणी, बॉयफ्रेंडनं केली आई-वडिलांची हत्या

तरुणी आपल्या श्वानाला घराबाहेर फिरायला घेऊन गेलेली असताना तिच्या बॉयफ्रेंडनं हत्या केल्याचा आरोप आहे.

  • Share this:

इंदौर, 18 डिसेंबर : तरुणी आपल्या श्वानाला घराबाहेर फिरायला घेऊन गेलेली असताना तिच्या बॉयफ्रेंडनं हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दुहेरी हत्याकांडानं शहर हादलं असून हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये पहाटेच्या सुमारास दुहेरी हत्येचा थरार घडला आणि सर्वांची झोप उडाली. या दुहेरी हत्याकांडाची महत्त्वाची कडी पोलिसांची हाती लागल्यानं ही केस सोडवण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. रुक्मणी नगरात राहणाऱ्या एसएएफमध्ये चालक ज्योती प्रसाद शर्मा आणि त्यांची पत्नी नीलम यांचा त्यांच्याच मुलीनं आपल्या प्रियकरासोबत कट रचून हत्या केल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे.

आरोपी युवती ही 17 वर्षांची अल्पवयीन आहे. ती 11 वीच्या वर्गात शिकत असून तिच्या प्रियकरासोबत मिळून हा कट रचला आहे. या दोघांनाही गुरुवारी रात्री उशिरा रतलाम इथून ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या पहाटे पाचच्या सुमारास करण्यात आली, ज्यात धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला होता.

हे वाचा-सामान्यांना मोठा दिलासा! पुढील वर्षापर्यंत नाही वाढणार कांद्याची किंमत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा प्रियकर आई-वडिलांची हत्या करत होता आणि आवाज यायला लागल्यानं आजी-आजोबा आणि शेजारचे लोक उठून आले. मुलीला शेजारच्यांनी विचारलं तेव्हा वडील नशेत आईशी भांडत असल्याचं तिने सांगितलं.

आजी-आजोबांसोबत झोपलेल्या मुलानं खिडकीतून आता पाहिलं तर रक्ताच्या थारोळ्यात चादरीत गुंडाळलेला आढलला. तातडीनं त्यानं आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली आणि ही घटना पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासात पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली ज्यामध्ये वडील शोषण करत असून आई त्यांची साथ देत आहे आणि त्यामुळे मी घर सोडत असल्याचं युवतीनं यामध्ये म्हटलं होतं. त्यामुळे मला शोधण्याचा प्रयत्न करू नका असाही उल्लेख यामध्ये केला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय युवतीवर बळावला आणि त्यांनी तिचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही आणि मिळालेल्या पुराव्यानं त्यांनी आरोपी धनंजय शर्मा आणि युवतीला ताब्यात घेतलं आहे. आरोपी धनंजय शर्मा हा गांधीनगरच्या माजी उपसरपंचाचा मुलगा आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 18, 2020, 12:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading