मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

तरुण-तरुणी रात्री गाडीत पित होते दारु, अचानक भलतंच घडलं!

तरुण-तरुणी रात्री गाडीत पित होते दारु, अचानक भलतंच घडलं!

इंदूरमध्ये (Indore)  रात्री एक वाजता एक मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकल्यानंतर लोकं तातडीनं घटनास्थळी गेले. तेंव्हा त्यांना तिथं एक स्कॉर्पियो (Scorpio) उलटलेली दिसली.

इंदूरमध्ये (Indore) रात्री एक वाजता एक मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकल्यानंतर लोकं तातडीनं घटनास्थळी गेले. तेंव्हा त्यांना तिथं एक स्कॉर्पियो (Scorpio) उलटलेली दिसली.

इंदूरमध्ये (Indore) रात्री एक वाजता एक मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकल्यानंतर लोकं तातडीनं घटनास्थळी गेले. तेंव्हा त्यांना तिथं एक स्कॉर्पियो (Scorpio) उलटलेली दिसली.

  • Published by:  News18 Desk

इंदूर, 28 डिसेंबर :  नवीन वर्ष (New Year) जवळ आलं की सेलिब्रेशनच्या नावावर दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांना (Drunk & Drive) रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागते. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमध्ये (Indore)  रात्री एक वाजता एक मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकल्यानंतर लोकं तातडीनं घटनास्थळी गेले. तेंव्हा त्यांना तिथं एक स्कॉर्पियो (Scorpio) उलटलेली दिसली. गाडीमधील तरुण आणि तरुणी दोघंही दारुच्या नशेत होते. लोकांनी त्यांना कसंबसं बाहेर काढलं. त्या दरम्यान तरुणी त्याच्या सोबत असलेल्या तरुणाचा मोबाईल घेऊन पळून गेली.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ‘हे दोघेही जण गाडीमध्ये दारु पित होते. त्यावेळी अचानक गाडी उलटली. हे तरुण शहरातल्या IT पार्कच्या दिशेनं येत होते, त्यावेळी हा अपघात झाला. या अपघातानंतर गाडीमध्ये मिळालेल्या कागदपत्रानुसार तरुणाचं नाव तेजवीर सिंह आहे. हा तरुण इतक्या नशेमध्ये होता की त्याला त्याचं नाव ही नीट सांगता येत नव्हतं. या अपघातामध्ये त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला. सुदैवानं गाडीमध्ये नशा करत असलेले दोघंही बचावले.

कार अपघाताची सलग दुसरी घटना

इंदूरमधील DAVV कॉलेजच्या कॅम्पस शनिवारी दुपारीच एक जबरदस्त अपघात झाला होता. एक 20 वर्षांचा तरुण भरधाव वेगानं कार चालवत असतानातच त्याच्या गाडीची समोरुन वेगानं येणाऱ्या कारशी धडक झाली. या अपघातामध्ये एक जणाचा मृत्यू झाला. यावेळी गाडीमध्ये चार तरुण होते. पोलिसांनी दोन्ही कार जप्त केल्या असून तरुणांना अटक केली आहे.

फी भरण्यासाठी आला होता तरुण

या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव गणेश देवी आहे. पोलिसांनी या अपघाताचं सीसीटीव्ही (CCTV) फुटेज जप्त केलं आहे. ज्या चार तरुणांच्या कारने गणेशच्या गाडीला धडक दिली ती कार वासू राठोड हा 20 वर्षांचा तरुण चालवत होता. वासूनं दिलेल्या जबानीनुसार, ‘तो कॉलेजची फी भरण्यासाठी त्याच्या मित्रांसह सागरहून इंदूरमध्ये आला होता. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये येताच त्याच्या गाडीला हा अपघात झाला.’

कॉलेज कॅम्पसमधील एका वळणावर गाडीवरचं संतुलन सुटलं अशी कबुली आरोपी वासूनं दिली आहे. दरम्यान आरोपी तरुण हे कॉलेजचे विद्यार्थी नव्हते ते केवळ फी भरण्यासाठी आले होते, असा दावा संचालक डॉ. संजीव टोकेकर यांनी केला आहे.

First published:

Tags: Crime