इंदूर, 08 सप्टेंबर : मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. तेव्हापासून शाळा-महाविद्यालये बंद आहे. परिणामी मुलं घरात असून सतत मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळत असल्याचे दिसून येत आहेत. मात्र या ऑनलाइन गेममुळे कोणाचा खून होऊ शकतो, असा विचार कधी केला आहे? मात्र मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये असा प्रकार घडला. इथं एका 11 वर्षीय मुलानं एका 10 वर्षीय मुलीची हत्या केली. याचं कारण ठरलं गेम.
10 वर्षीय मुलीच्या आई-वडिलांनी असा आरोप केला आहे की, त्यांची मुलगी या अल्पवयीन मुलाला ऑनलाइन गेममध्ये सतत हरवत होती. या रागातून 11 वर्षीय मुलानं या मुलीचं डोकं दगडानं ठेचलं. यात 10 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण इंदूर शहर हादरून गेलं आहे.
वाचा-जालना पोलीस दल हादरले, मुख्यालयातच एसआयने गोळी झाडून केली आत्महत्या
पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून. त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. इंदूरचे डीआयजी हरिनारायण चारी मिश्रा यांनी सांगितले की, आरोपी मुलाने मुलीला आपल्या घराजवळ नेऊन डोक्यात दगडा घातला.
वाचा-मोबाईलसाठी तो रक्ताचं नातंही विसरला, आईने दार उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
याआधीही झाला होता वाद
वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, मुलाला संशय होता की, या मुलीने त्याच्या एका उंदीराची हत्या केली आहे. यावरून मुलाला खूप राग आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी पाचवीत शिकणारी होती. डीआयजीने सांगितले की मुलाने केलेल्या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. मुलाने पोलिसांना सांगितले की उंदीरावरून त्या दोघांमध्ये वाद झाला होता.
वाचा-महिलेने रचना पतीच्या हत्येचा कट; तलवारीने वार करीत डोकं केलं धडापासून वेगळं
डीआयजी मिश्रा म्हणाले की, मोबाइल गेममध्ये मुलगी नेहमीच त्याला हरवत होती, त्याबद्दल मुलाच्या मनात एक निराशा होती. पोलीस आता मुलाला बाल सुधारगृहात पाठविण्याची तयारी करत आहेत.