एका खोलीत बंद होता पोलीस अधिकारी आणि ‘ती’, बायकोनं दोघांना रंगेहात पकडलं आणि...

एका खोलीत बंद होता पोलीस अधिकारी आणि ‘ती’, बायकोनं दोघांना रंगेहात पकडलं आणि...

एका महिलेला मारहाण करून तिचा शरीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

गंधवानी, 12 फेब्रुवारी: गंधवानी पोलीस ठाणा क्षेत्रात एका महिलेला मारहाण करून तिचा शरीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गंधवानी पोलीस ठाणा क्षेत्राच्या अधिकाऱ्यानेच ही मारहाण केल्याचं समोर आलं आहे. पतीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला आला होता. तिला या गोष्टीची भनक लागताच पत्नी आणि मुलासह ती शासकीय निवसस्थानी पोहोचून पत्नीने गोंधळ सुरू केला. त्यावेळी पतीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या गोंधळाचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीसही आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील गंधवानी पोलीस ठाण्याचे प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या पत्नीला भरदिवसा पोलिसांसमोरच मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. नरेंद्र सूर्यवंशी यांचे एका युवतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. दोन ते तीन दिवसांपासून ती सूर्यवंशी यांच्यासोबत राहात असल्याचं म्हणणं होतं. पत्नीला या गोष्टीची माहिती मिळताच तिने शासकीय निवास गाठलं. तिथे तिने दरवाजा बंद असल्याचं पाहिलं. पीडित पत्नीने गोंधळ सुरू केला त्यावेळी लोक जमा झाली. पत्नी आणि मुलाने या तरुणीला बाहेर काढण्याची मागणी केली. मात्र नरेंद्र सूर्यवंशी यांनी हा सगळा प्रकार रोखण्यासाठी पत्नीवर हात उचलला. त्यावेळी स्थानिकांनी पोलीस अधिकाऱ्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा घरगुती मामला आहे त्यामध्ये लोकांनी पडू नये असं सूर्यवंशी यांनी लोकांनाच सांगितलं आणि पत्नीला मारहाण केली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सुरुवातील बघ्याची भूमिका घेतली मात्र वातावरण तापल्याचं लक्षात येताच त्यांनी मध्यस्थी करून पीडितेला सोडवलं आहे.

सूर्यवंशी यांनी महिलेला बेदम मारहाण केली. तिचे केस ओढले आणि गळा पकडून फरफटत घरगुती प्रकरण रस्त्यावर आल्याच्या रागातून घेऊन जात असताना स्थानिक आणि पोलिसांनी मध्ये पडून हे प्रकरण शांत केलं आहे. पतीच्या तावडीतून या महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शासकीय निवासात असलेल्या तरुणीला ताब्यात घेतलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

First published: February 12, 2020, 11:49 AM IST

ताज्या बातम्या