मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

23 वर्षांपूर्वी पंखा चोरला, आता दोषी आढळल्यावर झाली इतकी शिक्षा

23 वर्षांपूर्वी पंखा चोरला, आता दोषी आढळल्यावर झाली इतकी शिक्षा

या प्रकरणातील आरोपी  23 मार्च 1998 रोजी एका दुकानातील दोन पंखे (Fan) चोरताना रंगेहाथ पकडला गेला होता. रात्रीच्या वेळी दुकान फोडून त्यामधील पंखे चोरताना पोलिसांनी त्याला अटक (Arrest) केली होती.

  • Published by:  News18 Desk

इंदूर, 4 फेब्रुवारी :  एखाद्या विषयावर वर्षानुवर्षे रेंगाळलेले खटले आपल्या देशात नवीन नाहीत. विशेषत: संपत्ती आणि जमिनीचे वाद तर अगदी एका पिढीतून दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या पिढीपर्यंत कोर्टात सुरु असतात. अशा प्रलंबित खटल्यांचं मोठं आव्हान न्याय व्यवस्थेसमोर (judiciary system)  आहे. त्यामुळे एखाद्या वर्षानुवर्ष रेंगाळलेल्या खटल्याचा जेंव्हा निकाल लागतो त्यावेळी त्याची बातमी होती. मध्य प्रदेशातील एका प्रकरणात तर 23 वर्ष जुन्या पंखा चोरी प्रकरणात कोर्टानं शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

PTI नं दिलेल्या वृत्तानुसार मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूर (Indur) येथील जिल्हा न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. शंकर असं या प्रकरणातील दोषी व्यक्तीचं नाव आहे. शंकर हा 23 मार्च 1998 रोजी एका दुकानातील दोन पंखे (Fan) चोरताना रंगेहाथ पकडला गेला होता. रात्रीच्या वेळी दुकान फोडून त्यामधील पंखे चोरताना पोलिसांनी त्याला अटक (Arrest) केली होती.

23 वर्षांनी निकाल का?

या प्रकरणात अटकेनंतर काही दिवसांनी शंकरला जामीन मिळाला. जामीन मिळताच शंकर फरार झाला. पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळाले नाही. अनेक वर्ष तो पोलिसांसाठी फरार होता.अखेर बऱ्याच वर्षांनी त्याला अटक झाली.

शंकरनं चोरी केली आहे, अशी साक्ष पाच जणांनी कोर्टात दिली. त्यानंतर प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी भूपेंद्र आर्य यांनी त्याला 1 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर त्याला एक हजार रुपयांचा दंडही न्यायायलायानं सुनावला आहे.

First published:

Tags: Crime, Madhya pradesh