सुनील रजक (शिवपूरी) 24 मार्च : मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. मध्य प्रदेशातील शिवपूरी येथील कोर्ट रोडवरील नगरपालिकेजवळील नाल्याच्या काठावर नवजात मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या नवजात मुलीला 20 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री 8.50 वाजता नवजात मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सिरसौदमध्ये राहणाऱ्या नवजात मुलीची आई रामदेवी लोधी यांनी सांगितले की, मुलीचा जन्म सोमवार, 20 मार्च 2023 रोजी सकाळी 6:00 वाजता झाला होता. त्यानंतर संध्याकाळी मुलीला SNCU या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान तिच्यावर उपचार सुरू असताना रात्री 8.50 च्या सुमारास मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान आई मुलीचा मृतदेह घेऊन हॉस्पिटलमध्ये फिरत राहिली. परंतु तीला कोणीही मदत करत नव्हते परंतु ती रात्रभर तशीच राहिली. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलसमोर चहा विक्रेत्याने तिला मदत केली.
दरम्यान त्या मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी त्याने तिच्याकडून 500 रुपये घेतले. दरम्यान मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. परंतु बुधवार, 22 मार्च रोजी सकाळी पुन्हा त्या मुलीच्या पालकांनी त्यांना फोन करून मुलीचा मृतदेह बाहेर आला असून, पुन्हा दफन करावे लागेल असे सांगितले. त्याने पुन्हा कुटुंबीयांकडून 100 रुपये घेतले.
त्यानंतर मुलीवर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु पुन्हा काल दि.23 रोजी त्या मुलीचा मृतदेह पुन्हा बाहेर आला. दरम्यान याबाबत आजूबाजूच्या परिसरात माहिती पसरल्यानंतर नागरिक भयभीत होऊन एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी कुटुंबीयांना शिवपुरी येथे बोलावले आहे. नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर मुलीच्या मृतदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रामदेवी लोधी यांनी सांगितले की, ही तिची सहावी प्रसूती होती परंतु तीला पुन्हा मुलगीच झाली. दरम्यान डॉक्टरांनीही 20 तारखेला मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Local18, Madhya pradesh, Police