मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नाइट कर्फ्यूमध्ये सुरू होता बेली डान्सचा जलवा, पोलीस आले आणि... पाहा VIDEO

नाइट कर्फ्यूमध्ये सुरू होता बेली डान्सचा जलवा, पोलीस आले आणि... पाहा VIDEO

 कोरोनामुळे निर्बंध असूनही भोपाळमधील (Bhopal) के-2 कल्बमध्ये बँकॉकसारखं वातावरण होतं. या कल्बमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी बेकायदेशीरपणे बेली डान्सर (Belly Dancer) बोलवण्यात आल्या होत्या.

  • Published by:  News18 Desk

भोपाळ, 28 डिसेंबर :  देशातील कोरोना (Covid 19) रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी संपलेली नाही. कोरोनावरील औषध येईपर्यंत का कायम आहे. त्यातच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अधिक खबरदारी घेतली जात आहे. ब्रिटनमधून येणारे विमानं बंद करण्यात आले असून महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू (Night Curfew) लावण्यात आला आहे. ख्रिसमस (Christmas ) आणि नवीन वर्षाच्या (New Year) सेलिब्रेशनवरही निर्बंध लादण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) देखील सध्या अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. या बंदीच्या काळातच भोपाळमधील के-2 कल्बमध्ये बँकॉकसारखं वातावरण होतं. या कल्बमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी बेकायदेशीरपणे बेली डान्सर (Belly Dancer) बोलवण्यात आल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत हे सर्व सेलिब्रेशन सुरु होते. अखेर पोलिसांनी क्लबवर धाड टाकली. पोलिसांची धाड पडताच क्लबमधील सर्वांचा मनोरंजनाचा ज्वर उतरला. आता या क्लबला कुलुप लावण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.

कल्ब मालकाची मस्ती!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार के-2 कल्ब विवेक शिवहरे यांच्या मालकीचा आहे. त्या कल्बच्या लाऊंजमध्ये रात्री उशीरा ख्रिसमस पार्टी (Christmas Party) सुरु होती. या पार्टीमध्ये अवैध पद्धतीनं दारु मिळत असल्याची माहिती अबकारी विभागाला मिळाली. त्यानंतर अबकारी विभागाची टीमनं क्लबवर छापा टाकला आणि सर्व अवैध दारु जप्त केली.

रात्री 11 नंतर दारुची विक्री सुरु असल्याच्या कारणामुळे अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाऊंज बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भडकलेले क्लब मालक विवेक शिवहारे आणि त्याची माणसं अबकारी विभागाच्या टीमशी भिडले. त्यांनी क्लब बंद करण्यास जोरदार विरोध केला.

" isDesktop="true" id="508853" >

पोलिसांनी टाकाला छापा

पोलिसांना या घटनेची माहिती समजतात त्यांनी क्लबवर छापा टाकला. पोलिसांना पाहताच आरोपी पसार झाले. त्यांचा शोध सध्या सुरु आहे. भोपाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी क्लब आणि लाऊंजचे लायसन रद्द केले आहे.

First published:

Tags: Covid19, Crime news, Video viral