मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं.

पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं.

पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं.

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. आरोपी पतीचं नाव रईस खान आहे. पत्नीला घटस्फोट हवा होता म्हणून तो नाराज होता. त्या नाराजीतून त्यानं हे भयंकर कृत्य केलं आहे पीडित महिला तिच्या पतीचा संशयी स्वभाव आणि रोज होणारी मारहाण याला कंटाळली होती, असं पोलिसांनी सांगितलं.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील (Bhopal, Madhya Pradesh) हा धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. 22 वर्षाच्या महिलेला पेटवण्यात आल्याचं या CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यावेळी ही पीडित महिला मदतीची याचना करत रस्त्यावर धावत होती. त्यावेळी प्रत्यक्षदर्शीनं पाणी टाकून ही आग शांत करण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी आपल्या घरातून पाणी आणून ओतलं आणि पीडित महिलेला वाचवलं. आरोपी रईस घटनास्थळावरून फरार झाला असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

3 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न

राजस्थानमधील अलीगंज छाबडामध्ये राहणाऱ्या रईसचं भोपाळमधील मुस्कानशी 4 एप्रिल 2019 रोजी लग्न झाले होते. त्यानंतर तीन वर्षांमध्ये त्यांच्या नात्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्कान तिच्या कुटुंबीयांशी मोबाईलवरून बोलताना नवरा संशय घेत असे आणि त्या संशयातून तिला मारहाण करत असे. नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून मार्च महिन्यात मुस्कान भोपाळला परत आली आणि तिच्या बहिणीसोबत राहत होती.

नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीवर केले अत्याचार, पीडित राहिली 2 महिने गरोदर

सही देण्यासाठी बोलावलं

मुस्कानं कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला होता. ती केअरटेकर म्हणून काम करत होती. रईसनं मंगळवारी तिला फोन करून, घटस्फोटाचे कागदपत्र ईमेल केले असून त्याची प्रिंट आऊट घेऊन स्वाक्षरी घेण्यासाठी बोलावलं. रईसच्या सांगण्यानुसार त्याला भेटली. त्यावेळी रईस मुस्कानला आपल्यासोबत नांदण्याची बळजबरी करत होता. मुस्काननं त्याचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानं संतापून त्यानं हे भयंकर कृत्य केलं, अशी माहिती आहे.

First published:
top videos

    Tags: Bhopal News, Crime news, Fire, Wife and husband