महिलेसोबत फ्लॅटमध्ये सुरू होते प्रेमाचे चाळे, ASI अधिकाऱ्याला पत्नीनं रंगेहाथ पकडलं आणि...

महिलेसोबत फ्लॅटमध्ये सुरू होते प्रेमाचे चाळे, ASI अधिकाऱ्याला पत्नीनं रंगेहाथ पकडलं आणि...

ASI असलेल्या पतीला त्याच्या प्रेयसीसोबत बायकोनं रंगेहाथ पकडलं. विशेष म्हणजे त्याची प्रेयसी देखील पोलीस (Police) कर्मचारी आहे. पोलिसांनी या दोघांना अटक न करता सोडून दिल्यानं बायोकनं नाराजी व्यक्त केली आहे.

  • Share this:

ग्वाहलेर, 12 डिसेंबर:  ‘बायकोला काय समजणार?’ या मस्तीमध्ये नवऱ्याचं बाहेर अफेयर सुरु असतं. फसवाफसवी फार काळ लपत नाही. त्यामुळे एके दिवशी बायकोला ती बातमी लागते. या बातमीची खात्री करण्यासाठी ती थेट घटनास्थळावर धडक मारते. नवरा आणि त्याच्या प्रेयसीला रंगेहाथ पकडते. भरपूर गोंधळ होतो. यानंतर असिस्टंट सब इन्सपेक्टर (ASI) असलेल्या नवऱ्याला ती पोलिसांच्या ताब्यात देते.

एखाद्या मालिकेत किंवा सिनेमात शोभावा असा हा प्रसंग मध्य प्रदेशातल्या (M.P.) ग्वाहलेरमध्ये घडला आहे. या प्रकरणातील पीडित महिलेला नवऱ्यावर संशय होता. तो प्रेयसीसोबत ग्वाहलेरमधल्या एका फ्लॅटमध्ये असल्याचे माहिती तिला समजली आणि तिनं नातेवाईकांसह अचानक त्या फ्लॅटचा दरवाजा ठोठावला.

बायकोला पाहताच उडाली तारांबळ

अगदी सकाळीच बायकोला दारावर पाहिल्यानं तिच्या नवऱ्याची आणि त्याच्या प्रेयसीची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे ती प्रेयसी देखील पोलीस कर्मचारी आहे. त्यांनी सुरुवातीला दार उघडण्याचं टाळलं, पण बाहेर गोंधळ वाढू लागल्यानं त्यांना अखेर दार उघडावं लागलं.

पीडित महिला आणि नातेवाईंकानी घराची पाहणी केल्यानंतर त्यांना घरात महिलेचे कपडे सापडले. यावर सुरुवातीला नवऱ्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली.  प्रेयसी बाथरुममध्ये लपली होती. महिलेच्या नातेवाईकांनी बाथरुमचा दरवाजा तोडण्याची धमकी दिल्यानंतर नाइलाजानं ती बाहेर आली.

प्रेयसीला समोर पाहताच पीडित महिला आणि नातेवाईकांचा राग अनावर झाला. त्यांनी दोघांचीही चांगलीच हजेरी घेतली. प्रेयसीनं आपले कोणतेही प्रेमसंबंध असल्याचं फेटाळात स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा केला. त्यानंतर मुरार ठाणे पोलीस स्टेशनात महिलेनं या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक न करता सोडल्यानं पीडित महिलेनं नाराजी व्यक्त केली आहे.

Published by: News18 Desk
First published: December 12, 2020, 11:29 AM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या