विदिशा, 16 डिसेंबर : नव्या नवरीसारखा श्रृंगार करून एका महिलेनं धक्कादायक पाऊल चलल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. साज श्रृंगार करून या महिलेनं आपल्या मुलाचं आणि नंतर स्वत:चं आयुष्य संपवलं. या महिलेनं आधी पोटच्या मुलाची हत्या केली आणि नंतर स्वत:ला संपवत आत्महत्या केली आहे. या महिलेनं आपल्या दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या महिलेचा पती ड्राय़व्हर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या महिलेनं आधी 6 आणि 3 वर्षांच्या मुलाची हत्या केली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे. ही महिला अंगणवाडीमध्ये सहाय्यक म्हणून काम करत होती. गळफास घेण्याआधी या महिलेनं नव्या नवरीसारखा साज श्रृंगार केला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाताच घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास केला. तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.
हे वाचा-'मुस्लीम समाजासाठी भारत धोकादायक आणि हिंसक', अल्पसंख्याक अहवालातील निरिक्षण
पोलिसांच्या म्हणण्यानुसार मृत महिलेची दोन महिन्यांपूर्वी प्रसूती झाली होती. त्यावेळी जन्माला आलेलं बाळ दोन महिनेच जगलं आणि त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार या महिलेनं या घटनेचा मोठा धस्का घेतला आणि त्यानंतर ती विचित्र वागायला लागली होती. मृत महिलेचा पती ड्रायव्हर म्हणून काम करतो.
या महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी नव्या नवरीसारखी वस्त्र आणि संपूर्ण पेहराव केला होता. पोलिसांनी मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवला आणि त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्याक दिला आहे. महिलेनं आत्महत्या कोणत्या कारणानं केली याचं कारण अद्याप समोर आलं नाही. या प्रकरणी पोलिसांकडून कुटुंबीय आणि शेजारच्या नागरिकांची चौकशी सुरू आहे.