• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • 17 वर्षीय मुलाचे पत्नीशी होते अनैतिक संबंध; दसऱ्याच्या कार्यक्रमात बोलावून केला खून

17 वर्षीय मुलाचे पत्नीशी होते अनैतिक संबंध; दसऱ्याच्या कार्यक्रमात बोलावून केला खून

पण राहुलनं त्याचं बोलणं गांभीर्यानं घेतलं नाही. त्यामुळं दशमीच्या दिवशी नितीशने राहुलला त्यांच्या भागातील जत्रा पाहण्यासाठी बोलावलं होतं, त्या दरम्यानही त्यानं त्याला खूप समजावलं पण राहुल त्याच्या पत्नीला भेटण्याबाबत ठाम राहिला.

 • Share this:
  मधेपुरा, 17 ऑक्टोबर : अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 17 वर्षीय मुलाचा ( 17 year old boy murder) खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राहुल कुमार असे मृत तरुणाचं नाव आहे. त्याचा मित्र नितीश यानेच त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी नितीशला खून प्रकरणी (Murder Case) अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून धारदार शस्त्रही जप्त केलं आहे. हा सर्व प्रकार बिहारच्या मधेपुरा येथील आहे. मधेपुरामध्ये एका 17 वर्षीय किशोरवयीन मुलाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडल्याने खळबळ उडाली होती. राहुल कुमार नावाच्या मुलाची हत्या केल्यानंतर मारेकऱ्याने त्याचा मृतदेह गावाजवळ मारुवाहकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या कडेला पाण्याने भरलेल्या खड्ड्यात फेकून दिला. शरीरावर धारदार शस्त्रांच्या अनेक खुणा आढळल्या आहेत. राहुलच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या लोकांनी नुकसान भरपाई आणि मारेकऱ्याच्या अटकेची मागणी करत राष्ट्रीय महामार्ग 106 तास रोखून धरला होता. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी 24 तासांच्या आत खुनाचे गूढ उकलल्याचा दावा केला आहे. हे वाचा - ‘लाईन मारण्याचे दिवस आता संपले’ म्हणत उदयनराजेंनी मारला डोळा VIDEO पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दाबिया (धारदार शस्त्र) जप्त केलंय. या संदर्भात, पोलीस अधीक्षक (एसपी) योगेंद्र कुमार यांनी सांगितले की, राहुलचा साथीदार नितीश हाच त्याचा मारेकरी आहे. राहुलचे आपल्या पत्नीशी अवैध संबंध असल्याचा संशय नितीशला होता. याबाबत नितीशने राहुलला पत्नीला भेटण्यास आणि बोलण्यास मनाई केली होती. पण राहुलनं त्याचं बोलणं गांभीर्यानं घेतलं नाही. त्यामुळं दशमीच्या दिवशी नितीशने राहुलला त्यांच्या भागातील जत्रा पाहण्यासाठी बोलावलं होतं, त्या दरम्यानही त्यानं त्याला खूप समजावलं पण राहुल त्याच्या पत्नीला भेटण्याबाबत ठाम राहिला. त्यानंतर संतापलेल्या नितीशने रागाच्या भरात नितीशला दाब्या नावाच्या शस्त्राने वार करून ठार मारले. हे वाचा - बुलडाणा हादरलं, 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर महिन्याभरापासून बलात्कार याप्रकरणी पोलीस अधीक्षक म्हणाले की, या प्रकरणाशी संबंधित सर्व वैज्ञानिक पुरावे आणि इतर माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच या प्रकरणी आरोपपत्र दाखल करून संबंधित आरोपींना शिक्षा होईल.
  Published by:News18 Desk
  First published: