STFची यशस्वी कारवाई, कानपूरमधून 'डॉक्टर बॉम्ब' अटकेत

STFची यशस्वी कारवाई, कानपूरमधून 'डॉक्टर बॉम्ब' अटकेत

  • Share this:

लखनऊ: 18 जानेवारी: मुंबईतून बेपत्ता झालेल्या डॉक्टर बॉम्बला उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये अटक करण्यात आली. डॉक्टर बॉम्ब देशातून पुन्हा पसार होण्याच्या तयारीत होता. पॅरोल तोडून डॉक्टर जलीस अन्सारी उर्फ डॉक्टर बॉम्ब फरार झाल्यानं खळबळ उडाली होती. प्रजासत्ताक दिन जवळ आलेला असताना डॉक्टर बॉम्ब पॅरोलवर असताना पसार झाल्यानं खळबळ उडाली होती. मात्र तपास यंत्रणांनी वेगानं तपास करून डॉक्टर जलीस अन्सारीला कानपूरमध्ये अटक केली. अन्सारी पुन्हा देश सोडून पसार होण्याच्या प्रयत्नात होता. त्याआधी डॉक्टर जलीस अन्सारीला अजमेर जेलमध्ये हजर व्हायचं होतं. पण गुरूवारीच पहाटे पाचच्या सुमारास डॉक्टर बॉम्ब बेपत्ता झाला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो 21 दिवसांच्या पॅरोलवर कुटुंबीयांशी भेटण्यासाठी तुरुंगाबाहेर आला होता.

डॉक्टर जलीस अन्सारी ऊर्फ डॉक्टर बॉम्बचे संबंध हे पाकिस्तानतल्या दहशतवादी संघटनांसोबतही आहेत. जलीस अन्सारीवर 50 हून अधिक साखळी बॉम्बस्फोटांचा आरोप आहे. १९९२ पासून सहा बॉम्बस्फोटाचे गंभीर आरोप आहेत. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातही जलीस अन्सारीचा सहभाग होता. जलीस अन्सारी जयपूर बॉम्बस्फोट, अजमेर बॉम्बस्फोट आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील दोषी आहे.

दहशतवादी जलीस अन्सारी हा इंडियन मुजाहिद्दीन आणि सिमी या दहशतवादी संघटनांशी जोडलेला होता. पाकिस्तानात बॉम्ब तयार करण्याची त्यानं प्रशिक्षण घेतलं होतं. डॉक्टर बॉम्बला अटक करून सुरक्षा यंत्रणांनी संभाव्य धोका टाळलाय. मात्र या पुढे पॅरोल देताना प्रशासनानं विचार करण्याची गरज निर्माण झालीय झालीय.

हेही वाचा- अखेर तारीख ठरली! निर्भयाच्या आरोपींना 1 फेब्रुवारीला देणार फाशी

हेही वाचा-3 सेकंदात घराचा चुराडा! स्फोटकं लावून उद्ध्वस्त केली इमारत, पाहा थरारक VIDEO

First published: January 18, 2020, 7:57 AM IST
Tags: lucknow

ताज्या बातम्या