Home /News /crime /

प्रेयसीला रात्री भेटणं जीवावर बेतलं, गावकऱ्यांनी केली तरुणाची हत्या

प्रेयसीला रात्री भेटणं जीवावर बेतलं, गावकऱ्यांनी केली तरुणाची हत्या

रात्री उशीरा तो मुलीच्या घराजवळ आला होता. त्याची कुणकूण कुटुंबीयांना लागताच घरातल्या काही लोकांनी हिराला पकडलं.

    पाटना 22 ऑगस्ट:  प्रेमासाठी काहीही करायला तरुण तयार होतात. प्रेयसीला रात्री भेटायला जाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलंय. विरह सहन न झाल्याने हा प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या गावी गेला. मात्र मुलीच्या घरच्या लोकांनी त्याला पकडून ठेवलं आणि गावकऱ्यांनी त्याची यथेच्छ धुलाई केली. ही मारहाण येवढी जास्त होती की त्यात त्याचा मृत्यू झाला. तर प्रेयसीच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या एका युवकालाही गावकऱ्यांनी मारहाण केली.  त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून प्रकृती गंभीर आहे. शेखपूरा गावची ही घटना असून हिरा कुमार असं त्या पीडीत युवकाचं नाव आहे. हीराचं शेखपूरा इथल्या एका मुलीवर प्रेम होतं. मात्र मुलीच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध होता. ते मुलीला घराच्या बाहेर जाऊ देत नव्हते. त्यामुळे अनेक दिवस त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे तिला रात्री भेटायचं या उद्देशाने तो गेला होता. हिरा त्यात गावात राहतो. रात्री उशीरा तो मुलीच्या घराजवळ आला होता. त्याची कुणकूण कुटुंबीयांना लागताच घरातल्या काही लोकांनी हिराला पकडलं. त्याच वेळी इतरही गावकरी जमा झाले आणि त्यांनी त्याला बेदम मारहाण केली ही मारहाण एवढी जास्त होती की त्यात त्याचा मृत्यू झाला. मामाच निघाले वैरी, 10 कोटींच्या प्रॉपर्टीसाठी भाच्यावर केला सिनेस्टाईल गोळीबार हिराला मदत करणाऱ्या युवकालाही बेदम मारहाण झाली असून त्याची प्रकृतीही गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाच्या कुटुंबीयांनी  गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी काही लोकांना ताब्यातही घेतलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या