मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रेयसीचा आला राग; दारावर डोकं आपटून घेतला जीव

लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रेयसीचा आला राग; दारावर डोकं आपटून घेतला जीव

प्रेमात मिळाला धोका! लग्नासाठी हट्ट केला म्हणून प्रेयसीलाच संपवलं

प्रेमात मिळाला धोका! लग्नासाठी हट्ट केला म्हणून प्रेयसीलाच संपवलं

प्रेमात मिळाला धोका! लग्नासाठी हट्ट केला म्हणून प्रेयसीलाच संपवलं

  • Published by:  Akshay Shitole

हरदोई, 12 मार्च : उत्तर प्रदेशातील हरदोई परिसरात महिलेचा मृतदेह मिळाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही तरुणी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्या महिलेचा मृतदेह नदीमध्ये मिळाल्यानं मोठी खळबळ माजली आहे. पिशवीत दगड आणि महिलेचा मृतदेह असं भरून नदीत फेकून देण्यात आलं होतं. पोलिसांनी याचा तपास घेतला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला विवाहित असून ती सासर सोडून माहेरीच राहात होती. डॉली असं या महिलेचं नाव आहे. 8 फेब्रुवारीच्या रात्री ही डॉली घरातून बेपत्ता झाली होती. प्राथमिक माहितीनुसार डॉलीचे तिच्य़ाच गावातील तरुणासोबत प्रेम संबंध होते. शुभन नावाच्या तरुणावर तिचं प्रेम होतं. त्याने लग्न करून आपल्याला त्याच्या घरी घेऊन जावं असा डॉलीचा अट्टाहास होता.आपलं प्रेम आपल्याला मिळावं अशी प्रत्येक तरुणीची इच्छा असते. मात्र प्रेमात धोका मिळाल्यानं तरुणीनं प्रियकाराच्या दारातच जीव सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे वाचा-..तर घरात बोभाटा करीन; शरीरसंबंध ठेवण्यास वहिनीनं 15 वर्षीय दीराला केलं मजबूर

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

8 फेब्रुवारीला डॉली प्रियकाराच्या घरी तावातावनं गेली. तिथे त्याला भेटून तिने लग्न करण्याचा तगादा लावला. शुभमने (प्रियकर)या गोष्टीला विरोध केला. त्यामुळे रागात असलेल्या डॉलीनं प्रियकराच्याच दारावर डोकं आपटून घेण्यास सुरुवात केली. डॉलीनं तमाशा सुरू केल्याचा राग प्रियकराला अनावर झाला आणि रागाच्या भरात त्यानंच तिचं डोकं जोर-जोरात दारावर आपटण्यास सुरुवात केली. तिचा जीव गेला आहे हे लक्षात येताच आरोपी प्रियकर भानावर आला आपण काय केलं आहे याची त्याला जाणीव झाली. त्याने आपल्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांच्या मदतीनं डॉलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकर शुभम आणि त्याला वडिलांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. 8 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या डॉलीचा मृत्यू झाल्याचं कळताच तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मृतदेह नदीतील पाणी कमी झाल्यामुळे वर आला. त्यामुळे बेपत्ता डॉलीचा पत्ता लागू शकला. आरोपींनी मृतदेह वर येऊ नये यासाठी पिशवीमध्ये मोठे दगड भरले होते. आरोपींविरोधात कलम 498, 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचा-पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पोत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

First published:

Tags: Up Police, Uttar pradesh