मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रियकरानं चाकूनं भोसकून प्रेयसीला संपवलं; स्वतःच पोलिसांत जात सांगितलं धक्कादायक कारण

प्रियकरानं चाकूनं भोसकून प्रेयसीला संपवलं; स्वतःच पोलिसांत जात सांगितलं धक्कादायक कारण

Representative Image

Representative Image

राबियाच्या पोस्टिंगसाठी आधीपासूनच एसडीएम ऑफिसमध्ये कामाला असलेल्या 25 वर्षीय निजामुद्दीननं भरपूर मदत केली होती. अशात दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर हिच मैत्री प्रेमात बदलली.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 31 ऑगस्ट : एका प्रियकरानं आपल्याच प्रेयसीची चाकूनं भोसकून हत्या केल्याची (Lover Killed his Girlfriend) धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. यानंतर आरोपीनं स्वतःच सरेंडर केलं आहे. चौकशीत त्यानं सांगितलं, की त्याच्या गर्लफ्रेंडचे दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध होते आणि ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. याच कारणामुळे त्यानं हे पाऊल उचललं. हे प्रकरण दिल्लीमधील (Delhi Crime News) आहे.

संगम विहार येथील रहिवासी असलेली 22 वर्षीय राबिया दिल्ली सरकारच्या सिव्हिल डिफेन्समध्ये काम करत होती. तिची पोस्टिंग साउथ इस्ट दिल्लीच्या SDM ऑफिसमध्ये होती. राबियाच्या पोस्टिंगसाठी आधीपासूनच एसडीएम ऑफिसमध्ये कामाला असलेल्या 25 वर्षीय निजामुद्दीननं भरपूर मदत केली होती. अशात दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर हिच मैत्री प्रेमात बदलली.

Fact Check : प्रश्नांची उत्तरं देऊन खरंच मारुती सुझुकी कंपनी देतेय का मोफत कार?

राबिया आणि निजामुद्दीन यांच्या प्रेमकथेत 26 ऑगस्टला एक वेगळच वळण आलं. निजामुद्दीननं राबियाच्या संपूर्ण शरीरावर चाकूनं वार केले आणि तिची हत्या केली. प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्यानं स्वतःच दिल्लीच्या कालिन्दी कुंज ठाण्यात जात सरेंडर केलं.

चौकशीत निजामुद्दीननं खुलासा केला, की राबिया आणि त्यानं साकेत कोर्टात लग्नही केलं होतं. मात्र, राबियाच्या कुटुंबीयांनी याला नकार दिला होता. यानंतर राबियाचे दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध सुरू झाले. ती सतत निजामुद्दीकडे दुर्लक्ष करत असे. अशात 26 ऑगस्टला निजामुद्दीननं राबियाला कॉल करून लाजपत नगर येथे बोलावलं. दोघंही फरीदाबादच्या सुरज कुंड परिसरात पोहोचले. इथेच दोघांमध्ये वाद झाला. यानंतर निजामुद्दीननं राबियावर चाकूनं वार करण्यास सुरुवात केली आणि तिची हत्या केली.

शेजारीच उठले एकमेकांच्या जीवावर!; क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्रांनी वार

राबियाच्या कुटुंबीयांनी असा दावा केला आहे, की त्यांच्या मुलीची प्लॅन करून हत्या केली गेली असल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, निजामुद्दीननं घरातून ऑफिसकडे जात असलेल्या राबियाला रस्त्यातच अडवलं आणि सूरज कुंड येथे घेऊन जात तिची हत्या केली. कुटुंबीयांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे.

First published:

Tags: Crime news, Murder news