मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रेयसीने प्रियकराला आयुष्यातून उठवलं, धक्कादायक माहिती उघड

ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रेयसीने प्रियकराला आयुष्यातून उठवलं, धक्कादायक माहिती उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही आत्महत्या नसून खून असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही आत्महत्या नसून खून असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही आत्महत्या नसून खून असल्याचे उघड झाले आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

रहमान (बस्ती), 02 एप्रिल : उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील कंघुसारा गावात 29 मार्च रोजी विकास चौधरी नावाच्या तरुणाचा मृतदेह कालव्यात सापडला होता. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या याबाबत शंका व्यक्त केली जात होती. यामध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही आत्महत्या नसून खून असल्याचे उघड झाले आहे. हा खून विकास चौधरीच्या प्रेयसीनेच केला असल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खून करण्यात आलेल्या दोघांना अटक करण्यात आले आहे. पहिल्या प्रियकरासोबत पटत नसल्याने दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने एका मुलीने हा खून केला असल्याची माहिती उघड झाली आहे. प्रेयसी आपल्या प्रियकरासोबत नाराज झाल्याने दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रियकराचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. 

Video : अपघात कसा झाला? टेम्पो पलटी झाल्यावर ड्रायव्हरनेच लावला डोक्याला हात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विकासचे गावातीलच एका तरुणीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान त्यांच्यातील किरकोळ कारणावरून होत असलेल्या वादामुळे दोघांमध्ये कटुता येऊ लागली. याच गोष्टींचा फायदा घेत त्या मुलीने दुसऱ्यासोबत आपले सूत जुळवलं. या कारणातून ती पहिल्या प्रियकराला भेटणे बंद केले. त्यानंतर विकासने तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

विकासने याआधीही मुलीचे अश्लील व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ क्लिप बनवले होते, आता विकासने तरुणीला जबरदस्तीने फोन करून धमकी दिली आणि ती न आल्यास व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला.

धावत्या ट्रेनच्या दरवाजात उभा राहून तरुणीचा विचित्र 'पराक्रम'; VIDEO पाहून संतापले नेटकरी

यावर ती मुलगी त्याला भेटण्यास गेल्यावर तिचे लैंगीक शोषण करण्यास त्याने सुरूवात केली.  यावर  त्या मुलीने आपल्या दुसऱ्या प्रियकराला घटनास्थळी बोलवून घेत विकासचा गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकून दिला आणि पळून गेले.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना एएसपी दीपेंद्र चौधरी म्हणाले की, तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर मृताच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून गावातील तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात गळा आवळून खून केल्याचे प्रकरण समोर आले आहे. खून केलेल्या दोघांना पकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Local18, Love story, Uttar pradesh news