Love...Sex...धोका! फेसबुकवर जुळलं प्रेम; लग्नाच्या 3 वर्षांनंतर तरुणाचा धक्कादायक प्रताप

Love...Sex...धोका! फेसबुकवर जुळलं प्रेम; लग्नाच्या 3 वर्षांनंतर तरुणाचा धक्कादायक प्रताप

फेसबुकवरील प्रेमप्रकरण या तरुणीला खूप महागात पडलं आहे.

  • Share this:

छत्तीसगड, 23 डिसेंबर : येथील एका तरुणीला फेसबुकवर (Facebook) एका तरुणावर जीव जडला आणि त्यानंतर प्रेमात त्यांनी लग्नगाठही बांधली. पतीने लग्नाच्या वेळेस सप्तपदी घेताना कायम साथ देण्याची शपथ घेतली. काही दिवसातच पती लग्नाच्या दिवशी घेतलेली शपथ विसरला. त्यानंतर पती आपली पत्नी आणि मुलाला एकट सोडून निघून गेला. आता पत्नीने आपल्या पतीला शोधण्यासाठी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

ही कोणा चित्रपटाची कथा नाही, तर खऱ्या आयुष्यात घडलेलं वास्तव आहे. ही घटना छत्तीसगडमधील रामगढ जिल्ह्यातील आहे.

येथे राहणाी किरण बेदिया नावाच्या तरुणीचे अजय बेदिया या तरुणासोबत फेसबुकवर ओळख झाली व त्याचं प्रेमात रुपांतर झालं. यानंतर त्या दोघांनी प्रेमविवाह केला आणि दोघांनी कायम एकत्र राहण्याचं वचन दिलं. यावेळी मुलीला माहीत नव्हतं की तिला प्रेमात धोका मिळणार आहे. लग्नाच्या काही वर्षात तरुणाने विवाहबाह्य संबंध बनवले व कोणाला काहीही न सांगता 3 वर्षांचा मुलगा व पत्नी सोडून निघून गेला. आता तरुणी स्वत:साठी व तिच्या मुलासाठी न्याय मागण्यासाठी भटकत आहे.

तरुणीने आरोप केला आहे की तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होत नाही. पोलीस प्रशासनही केवळ आश्वासन देत आहे. पीडिता किरण बेदियाने सांगितलं की, फेसबुकवर चर्चेदरम्यान तिचं अजय सोबत प्रेम जुळलं. 2013 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यानंतर पती हुंड्यासाठी पत्नीला मारहाण करत होता. 2017 मध्ये जेव्हा मूल झालं त्यानंतर त्यांच्या नात्यातील दुरावा वाढवा.

किरण बेदियाने सांगितलं की, आता माझ्या पतीने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं व तो तिच्यासोबत राहत आहे. मी न्यायासाठी भटकत आहे. मात्र कोणीच मात्र ऐकून घेत नाही. किरण बेदिया यांचा भाऊही न्यायासाठी पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. यावर पीडितेच्या भावाचं म्हणणं आहे की, आम्ही दररोज पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. माझ्या बहिणीला न्याय मिळावा, माझी इतकीच मागणी आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: December 23, 2020, 2:49 PM IST
Tags: marriage

ताज्या बातम्या