नवी दिल्ली, 06 डिसेंबर : प्रेमाला विरोध करत वडिलांनी तरुणाला गावी पाठवून दिल्याचा रागातून माथेफिरू प्रियकरानं टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेमुळे उत्तर दिल्लीमध्ये मोठी खऴबळ उडाली. प्रेमात अडसर आणि प्रेयसीला गावी पाठवल्याच्या रागातून प्रियकरानं प्रेयसीच्या वडिलांवर धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
नेमकं काय आहे प्रकरण?
50 वर्षांचे ब्रिजेंद्र उत्तर पूर्व दिल्लीत सोनिया विहार इथले रहिवासी. पत्नी आणि दोन मुलं असा परिवार. त्यांच्या मुलीनं 7वीपर्यंतचं शिक्षण घेतलं मात्र पुढे शाळा सोडली आणि घराच्या कामांमध्ये मदत करू लागली. त्याच परिसरातील सूरज नावाच्या तरुणासोबत तिचं प्रेम जुळलं. याची माहिती तरुणीचे वडील ब्रिजेंद्र यांना मिळाली आणि संताप अनावर झाला.
ब्रिजेंद्र यांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला. सूरजसोबत बोलू नये यासाठी धमकवण्यात आलं. तरुणी आणि सूरज तरीदेखील गुपचूप बोलत बोलत आणि भेटत होते. ब्रिजेंद्र यांना याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या मुलीला गावी पाठवून दिले. समजावून देखील ऐकत नसल्यानं त्यांनी तिला गावी पाठवलं.
हे वाचा-वर्गातच अल्पवयीन मुला-मुलीचं लग्न; मंगळसुत्र, सिंदुर भरतानाचा VIDEO VIRAL
प्रेयसीला गावी पाठवलं आणि तिची भेट होणार नाही यामुळे सूरजचं डोकं संतापलं आणि या माथेफिरूनं थेट प्रेयसीच्या घरात घुसून वडिलांवर धारदार शस्त्रानं वार करत त्यांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. ब्रिजेश यांची पत्नी घरी आली तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात दिसले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांकडून या प्रकरणी फरार आरोपीचा शोध सुरू आहे. सूरजनं त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती मात्र बिजेंद्र यांनी कधीच ते मनावर न घेतल्याची माहिती पत्नीनं पोलिसांना दिली आहे.