मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /प्रेम अन् धोका!..म्हणून कुटुंबीयांनी घराबाहेर काढलं, तर गावकऱ्यांनी तरुणीचे लचकेच तोडले

प्रेम अन् धोका!..म्हणून कुटुंबीयांनी घराबाहेर काढलं, तर गावकऱ्यांनी तरुणीचे लचकेच तोडले

प्रेमाची अशी शिक्षा तरुणीला भोगावी लागली.

प्रेमाची अशी शिक्षा तरुणीला भोगावी लागली.

प्रेमाची अशी शिक्षा तरुणीला भोगावी लागली.

पाटना, 18 मार्च : बिहारमधील (Bihar News) एका तरुणीने ज्या प्रियकरावर डोळे बंद करून विश्वास ठेवला, त्यानेच धोका दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकारानंतर तिला घराबाहेर काढण्यात आलं. यानंतर तिच्यासोबत जे काही घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कुटुंबीयांनी हाकलून दिल्यानंतर तरुणी गावात भटकत होती. तर काही तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. वेदना आणि दु:खाची ही कहाणी बगहा जिल्ह्यातील आहे.

तरुणीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, तब्बल 6 महिन्यांपूर्वी ती राघवेंद्र मिश्र उर्फ लप्पु मिश्रसोबत भेट झाली होती. लप्पुने प्रेमाचं नाटक करून तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. जेव्हा ती गर्भवती झाली तर त्याने लग्नाचं वचन दिलं. यानंतर लग्नाचं वचन देत तरुणीचं गर्भपात केला. यानंतर तरुणाने लग्नास नकार दिला.

हे ही वाचा-फुगा मारल्याचा जाब विचारल्याचा राग;तरुणावर प्राणघातक हल्ला, डोळा थोडक्यात बचावला

कुटुंबीयांना जेव्हा या घटनेबद्दल कळालं. यानंतर त्यांनी तरुणीला घराबाहेर हाकलून दिलं. यानंतर ती गावातील एका शाळेत राहू लागली. यादरम्यान 5 मार्च रोजी रात्री गावातून दोन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, आणि कोणाला काही सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर मुलगी खूप घाबरली. 11 मार्चच्या रात्री गावातील आणखी एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर 16 मार्च रोजी महिला पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली.  तक्रारीनुसार, पोलिसांनी तरुणाच्या प्रियकराला अटक केली आहे. आणि तरुणीला वैद्यकीय तपासासाठी पाठवण्यात आलं आहे. गावातील तीन तरुणांचा तपास सुरू आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news, Gang Rape