Home /News /crime /

लग्नानंतर जुळलं प्रेम; कुटुंबीयांनी आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर दोघांची एकत्र आत्महत्या

लग्नानंतर जुळलं प्रेम; कुटुंबीयांनी आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर दोघांची एकत्र आत्महत्या

धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीला 15 दिवसांची मुलगीही आहे. त्याशिवाय महिलेचीही मुलं आहेत.

    धर्मशाला, 19 ऑगस्ट : हिमाचल प्रदेशातील ऊना (Una) जिल्ह्यातील पंजोआ भागातील घर सोडलेल्या जोडप्याने धर्मशाळेजवळील एका खासगी हॉटेलमध्ये विष पिऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघांनी बुधवारी रात्री विष खाल्लं आणि गुरूवार सकाळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना मिळाली. यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अद्याप मृतांची ओळख सार्वजनिक केलेली नाही. (love after marriage two committed suicide together after being seen in an abusive situation by family member) मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती एक शिक्षक असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला 2 मुलंही आहेत. ज्यातील एक मुलगी अवघ्या 15 दिवसांची आहे. मृत शिक्षकाची पत्नीदेखील शिक्षिका आहे. तर ज्या महिलेने आत्महत्या केली, तिचं ऊना अंबोटामध्येच माहेर आहे. महिलेचं येथेच लग्न झालं होतं. त्याजवळपासून मृत शिक्षकाचं घर होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या लग्नाच्या नंतर हे दोघे संपर्कात आले होते. मृत महिलेलादेखील 2 मुलं असल्याचं सांगितलं जात आहे. हे ही वाचा-कंडोममध्ये सोनं घालून प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं; अधिकारीही हैराण! कामामुळे पती होता बाहेर महिलेचा पती बाहेर एका कंपनीत नोकरी करीत होता आणि कामासाठी अधिकतर घराबाहेरच राहत होता. सांगितलं जात आहे की, काही दिवसांपूर्वी घरातील नातेवाईकांनी या दोघांना आक्षेपार्ह स्थिती पाहिलं होतं. यानंतर बराच गोंधळ झाला होता. या सर्वात दोघे आपल्या घरातून पळ काढत धर्मशाला येथे राहत होते. येथेच धक्कादायक अवस्थेत हॉटेलच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी काय सांगितलं? दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. सध्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना बोलावण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहबाह्य संबंधातून या दोघांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Love, Suicide

    पुढील बातम्या