मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

गरीब आणि दलित वस्तीवर नजर; मदतीच्या बहाण्याचे मोठं पॅकेज, असा सुरू होता धर्म परिवर्तनाचा खेळ!

गरीब आणि दलित वस्तीवर नजर; मदतीच्या बहाण्याचे मोठं पॅकेज, असा सुरू होता धर्म परिवर्तनाचा खेळ!

या प्रकरणात चार जणांना अटक केलं असून यामध्ये दक्षिण कोरियातील महिलेचाही समावेश आहे

या प्रकरणात चार जणांना अटक केलं असून यामध्ये दक्षिण कोरियातील महिलेचाही समावेश आहे

या प्रकरणात चार जणांना अटक केलं असून यामध्ये दक्षिण कोरियातील महिलेचाही समावेश आहे

  • Published by:  Meenal Gangurde
नाॅएडा, 20 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) ग्रेटर नॉएडामधील सुरजपूर भागात हिंदू कुटुंबातील (Hindu Family) सदस्यांना मदत करण्याच्या बहाण्याने आणि लोभ देऊन धर्मांतरण करण्याच्या आरोपाखाली पोलिसांना चार जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दक्षिण कोरियातील महिलेचाही समावेश आहे. कथित स्वरुपात ती या टीमची प्रमूख असल्याचे सांगितले जात आहे. त्या चौघांची चौकशी सुरू आहे, मात्र अद्याप त्यांनी कोणतीच महत्त्वपूर्ण माहिती दिलेली नाही. पोलिसांनी सांगितलं की, आरोपींमध्ये दक्षिण कोरियाची निवासी अनमोल, सीमा, संध्या आणि उमेश यांचा समावेश आहे. अनमोलदेखील सद्यस्थितीत ग्रीस सोसायटीत भाड्याने राहत होती. या गँगचे सदस्य शहरातील अनेक भागात धर्म परिवर्तनाचं काम करीत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुस्तकं देऊन करीत होते मदत याबाबत जवळील शहरातील पोलिसांनी संपर्क केला जात आहे. अद्याप आरोपींनी त्यांच्या साथीदारांची माहिती पोलिसांना दिलेली नाही. पोलिसांच्या तपासात एक गोष्ट मात्र समोर आली आहे, ज्यानुसार लोक धर्म परिवर्तन करण्यासाठी तयार होत होते. यासाठी त्यांना मोठी रक्कम दिली जात होती. त्यांच्या मुलांचे शिक्षण, पुस्तकं आणि स्टेशनरी आदी सामान उपलब्ध करुन दिलं जात होतं. हे लोक दलित वस्ती आणि झोपडपट्टीतील गरीब कुटुंबाना आपल्या निशाण्यावर ठेवत व अशाच लोकांच्या मुलांना मदत करीत. पहिल्यांदाही झाली होती अटक धर्म परिवर्तन प्रकरणात दादरी आणि जारचा भागात आरोपी यापूर्वीही आले होते. अनेकजणांना पोलिसांनी यापूर्वीही अटक केली होती. अनेक भागातून आरोपींना पकडल्यानंतर मारहाणीच्या घटनादेखील समोर आल्या होत्या. यादरम्यान पोलिसांनी निर्णय घेत प्रकरण सोडवलं होतं.
First published:

Tags: Crime news, Uttar pradesh

पुढील बातम्या