'लॉकडाऊनमध्ये बलात्कार करून गर्भपाताचं दिलं औषध', अल्पवयीन मुलीचा वडिलांवर आरोप

'लॉकडाऊनमध्ये बलात्कार करून गर्भपाताचं दिलं औषध', अल्पवयीन मुलीचा वडिलांवर आरोप

वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली.

  • Share this:

कानपूर, 14 जून : वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी लॉकडाऊनमध्ये लैंगिक शोधण करून गर्भपात करायला लावल्याचा आरोप अल्पवयीन मुलीनं केला आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर देहात परिसरात घडली आहे.

अल्पवयी मुलीनं पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आपल्या वडिलांनीच लोकडाऊनचा काळात बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना बेड्या ठेकल्या आहेत.

हे वाचा-80 वर्षांच्या नराधमाचे संतापजनक कृत्य, दोन अल्पवयीन बहिणीवर केले अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीच्या वडिलांना दारूचं व्यसन आहे. यामुळे मागील दोन वर्षांपासून पत्नी आपल्या दोन मुली आणि एका मुलासह भाड्याच्या घरात स्वतंत्र राहत आहे. दुसरी मुलगी वडिलांसोबत राहाते. लॉकडाऊन झाल्यापासून वडिलांनी आपल्या मुलीसोबत जबरदस्ती शरीरिक संबंध ठेवले त्यातून गर्भ राहिल्यानंतर त्यांनी तो पडण्यासाठी औषधही दिलं, असा आरोप अल्पवयीन मुलीनं वडिलांवर केला.

वडिलांनी पोलिसांनी आपण निर्दोष असल्याचं सांगितलं आहे. अल्पवयीनं मुलीनं दिलेल्या फिर्यादीवरून वडिलांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हे वाचा-शेतातील गंजीला अचानक लागली आग, वृद्ध दाम्पत्याचा अक्षरश: झाला कोळसा

हे वाचा-कारमध्ये असं काय सापडलं की, 'बाहुबली' फेम अभिनेत्रीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 14, 2020, 10:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading