बायकोला दिला धोका नंतर गर्लफ्रेंडचा खेळ खल्लास, अशी समोर आली मर्डर मिस्ट्री

बायकोला दिला धोका नंतर गर्लफ्रेंडचा खेळ खल्लास, अशी समोर आली मर्डर मिस्ट्री

पिंकी तिचा प्रियकर सुमित उर्फ ​​सौरभसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं आढळलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे : लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी एका महिलेच्या हत्येचा धक्कादायक खुलासा केला आहे. महिलेच्या प्रियकरानेच तिचा गळा आवळून खून केल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शहरात पीजी उघडण्यासाठी ही महिला प्रियकराकडे पैशांची मागणी करत होती. या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद झाला.

डीसीपी राजेश कुमार सिंह यांनी सांगितलं की, बुधवारी महिलेचा मृतदेह जनता फ्लॅटमध्ये पडला होता. पिंकी असं या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, फ्लॅटमध्ये पिंकी तिचा प्रियकर सुमित उर्फ ​​सौरभसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं आढळलं. सुमित हा हरियाणाच्या बल्लभगडमधील प्रल्हादपूर गावचा आहे.

पोलीस चौकशीत आरोपी सुमितनं सांगितलं की, ग्रेटर नोएडामध्ये पीजी उघडण्यासाठी पैसे देण्यासाठी पिंकी त्याच्यावर दबाव आणत होती. यामुळे हे दोघे बराच वेळ भांडत होते. याचा कंटाळून त्याने पिंकीचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी आरोपींकडून दुचाकी जप्त केली आहे.

डीसीपी राजेश कुमार म्हणाले की, आरोपी सुमित विवाहित आहे. त्याला एक आठ वर्षांचा मुलगा आहे आणि तो त्यांच्यासोबतच राहत होता. घटनेच्या दिवशी त्याचा मुलगा घरी झोपला होता. पिंकीच्या हत्येनंतर मुलाला घेऊन सुमित घरातून पळून गेला. तो मुलाला त्याच्या घराबाहेर ठेवून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु पोलिसांनी त्याला पकडले.

पीजी उघडण्याबाबत दोघांमध्ये वाद झाला

पोलिसांनी सांगितले की, सुमित आणि पिंकीला ग्रेटर नोएडा इथे एकत्र पीजी चालवत होते. पिंकी काही दिवसांपासून सुमितवर वेगळी पीजी तयार करण्यासाठी दबाव आणत होती. पैशांच्या व्यवहाराबाबतही दोघांमध्ये वाद झाला. या वादाला कंटाळून त्याने ही घटना घडवून आणल्याचे आरोपीने सांगितले.

First published: May 15, 2020, 11:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading