भयंकर! इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करण्यावरुन वाद, लिव्ह इन पार्टनरनं प्रेयसीला जिवंत पेटवलं

भयंकर! इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करण्यावरुन वाद, लिव्ह इन पार्टनरनं प्रेयसीला जिवंत पेटवलं

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ (Instagram Video) अपलोड करण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आरोपीनं आपल्या प्रेयसीला रॉकेल ओतून पेटवून दिलं.

  • Share this:

तिरुअनंतपुरम 11 जून : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live-in Relationship) राहाणाऱ्या एका युवकानं आपल्या प्रेयसीला जिवंत जाळल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेत 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवर व्हिडिओ (Instagram Video) अपलोड करण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा व्हिडिओ तरुणीनं शूट केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 8 जूनला या दोघांमध्ये वाद झाले, यानंतर तरुणानं प्रेयसीला पेटवून दिलं. गुरुवारी तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला.

ही घटना केरळमधील (Kerala) असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्लम जिल्ह्यातील अंचलमध्ये 28 वर्षीय आथिरा अथिराला तिच्या लिव्ह इन पार्टनरनं (Live-in partner) पेटवून दिलं. हे दोघं बऱ्याच काळापासून एकत्र राहात असून त्यांना तीन महिन्यांचं एक बाळही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करण्यावरुन वाद झाला. यात शानवासनं आथिरावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं.

नागपूर ब्रेकिंग: खंडणी म्हणून मागितलं मुंडकं, अपहरण करुन मुलाची हत्या

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आथिराचा ओरडण्याचा आवाज ऐकला. बाहेर येऊन पाहिलं असता आथिरा घरातून बाहेर पळत होती आणि तिला आग लागली होती. सर्वांनी मिळून तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी तिचा मृत्यू झाला. यादरम्यान आरोपीही जखमी झाला होता, त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केलं. आथिराच्या आईच्या तक्रारीनंतर शानवासविरोधाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CD मुळे खळबळ; महापौरांचे पती अन् RSS प्रचारक 20 कोटी कमिशन मागताना कॅमेऱ्यात कैद

तरुणीनं प्रियकराविरोधात शारिरीक आणि लैंगिक शोषणाचा आरोप करत आपल्याला एक महिना फ्लॅटमध्ये बंधक बनवून ठेवल्याचं म्हटलं होतं. या तक्रारीनुसार, पोलिसांनी ८ एप्रिलला गुन्हा दाखल केला होता. यानंतर आरोपी मार्टिन जोसेफ फरार झाला होता. पोलिसांनी सांगितलं, की या आरोपीनं महिलेकडून पाच लाख रुपयेही बळकवले होते.

Published by: Kiran Pharate
First published: June 11, 2021, 9:28 AM IST

ताज्या बातम्या