रागामुळे गमावला जीव! कारचालकाला मारण्याचा प्रयत्न करीत होता दुचाकीस्वार आणि...भयंकर घटनेचा CCTV VIDEO

रागामुळे गमावला जीव! कारचालकाला मारण्याचा प्रयत्न करीत होता दुचाकीस्वार आणि...भयंकर घटनेचा CCTV VIDEO

एका छोट्याशा कारणामुळे 30 वर्षीय आर्किटेक्टचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

इंदूर, 18 डिसेंबर : एका छोट्याशा कारणामुळे 30 वर्षीय आर्किटेक्टचा दुर्देवी मृत्यू (Death due to anger) झाल्याची घटना समोर आली आहे. रागावर नियंत्रण न ठेवल्याने दुचाकीस्वार (Two wheeler) व कारचालकामध्ये वाद झाला व यातच कारचालकाचा मृत्यू झाला. पलासिया येथे हातिम नाक्यावर गुरुवारी सकाळी 11 वाजता उत्कर्ष विहार कॉलोनीतील आर्किटेक्टच्या कारकडून एका दुचाकीस्वाराला टक्कर लागली. यानंतर रागाच्या भरात दुचाकीस्वार कारचालकाजवळ आला. तो त्याच्यासोबत वाद करू लागला. मारहाणही केली.

दोघांमध्ये मारामारी सुरू असताना दुचाकीस्वाराने ऑर्किटेक्टला धक्का दिला. तो खाली पडला. नेमकी त्याचवेळी तेथून मोठा ट्रक जात होता. आर्किटेक्ट ट्रकच्या खाली सापडला व यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली असून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात शुक्रवारी सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये दुचाकीस्वार कारचालकाला मारहाण करीत असल्याचं दिसत आहे.

पलसिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कर्ष विहार कॉलनीमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय सिद्धार्थचा यामध्ये मृत्यू झाला. पोलिसांनी दुचाकीस्वार विकास यादव याला अटक केली आहे. सोबतच पोलिसांनी चिरडणारा ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे.

30 वर्षीय सिद्धार्थचा यामध्ये मृत्यू झाला

30 वर्षीय सिद्धार्थचा यामध्ये मृत्यू झाला

प्रत्यक्षदर्शीं म्हणाले...

हातिम नाक्यावर ऑटो रिक्षामध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलं की, ही घटना सकाळी 11 नंतरची आहे. एका कारने अॅक्टिवाला जराशी टक्कर मारली होती. ही टक्कर खूप हलकीशी होती. मात्र तरीही दुचाकीस्वार रागाच्या भरात कारचालकाकडे गेला व वाद करू लागला. दुचाकीस्वार कारचालकाला शिव्या देऊ लागला. कारचालक साधा होता. ते सॉरी म्हणाले..मात्र दुचाकीस्वार त्यांना शिवीगाळ करीत होता. तो बराच जाडजूड होता. त्याने कारचालकाच्या कानशिलात लगावली. कारचालकही स्वत:चा बचाव करू लागला. त्यानंतर कारचालक आपली ताकद दाखवित त्याच्यासोबत मारामारी करू लागला. कारचालक माफी मागत होता. मात्र तरीही दुचाकीस्वाराने ऐकलं नाही. आम्ही हा वाद सोडविण्यासाठी जाण्याचा विचार करीत होता. तेवढ्यात दुचाकीस्वाराने कारचालकाला जोरात मारलं व तो खाली पडला. कारचालक स्वत: ला सांभाळणार तितक्यात जवळून मोठा ट्रक गेला. आणि तो ट्रकच्या चाकाखाली आला. आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. हे पाहून दुचाकीस्वार गाडी घेऊन पळू लागला. मात्र लोक त्याच्या मागे लागले व त्याला पकडलं. यानंतर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी दुचाकीस्वाराला पकडलं.

कारचालक शिव्या देत होता म्हणून...

आरोपी विकास यादवने सांगितलं की, मला मागून कारची टक्कर लागली. मला आणि अॅक्टिवाला नुकसान झालं नाही. मी कारचालकाकडे गेलो तर तो शिव्या देऊ लागला. मला सहन झालं नाही व मी त्याच्यावर हात उचलला. दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान अचानक तो खाली पडला आणि नेमकी त्याचवेळी तेथून ट्रक गेला व कारचालक ट्रकच्या चाकाखाली आला. मला स्वत:ला याचं दु:ख आहे की माझ्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

सिद्धार्थचे मित्र म्हणाले...

सिद्धार्थच्या मित्रांनी सांगितलं की, तो खूप साधा आहे. तो शिव्या देऊच शकत नाही. दुचाकीस्वाराने त्याची हत्या केली. पोलिसांनी हत्येची केस दाखल करावयास हवी. सिद्धार्थचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. चार दिवसांपर्यंत त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याच्या वडिलांचं डिटर्जेंट पावडर तयार करण्याचा कारखाना आहे. घरी आई, पत्नी आणि छोटी बहीण असं कुटुंब आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: December 18, 2020, 7:19 PM IST

ताज्या बातम्या