मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Mumbai : मनी हाईस्टलाही टाकलं मागे; फक्त 5 सेकंदात बँकेला लाखो रुपयांचा चुना

Mumbai : मनी हाईस्टलाही टाकलं मागे; फक्त 5 सेकंदात बँकेला लाखो रुपयांचा चुना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  News18 Desk

अमित राय, प्रतिनिधी

मुंबई, 24 सप्टेंबर : एकीकडे ऑनलाईन फसवणुकीपासून लोकांना सजग करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना आणल्या जात आहेत. असे असताना दुसरीकडे सराईत चोरटे हात साफ करताना दिसत आहेत. कारण ऑनलाईन चोरीची एक अनोखी पद्धत समोर आली आहे. यात चोरट्यांनी बँकेसह एटीएम मशीनही हॅक करून अवघ्या 5 सेकंदात बँकेला लाखो रुपयांचा चुना बँकेला लावला आणि याबाबत कुणाला कळलेसुद्धा नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण - 

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. हे चोरटे फक्त लोकांनाच नाही तर बँकानाही गंडा घालत आहेत. हे चोरटे हरियाणाचे आहेत. त्यांनी इतर राज्यात गुन्हे केले आहेत. त्यांना ही चोरी करताना फक्त 5 सेकंद लागतात. आरिफ खान आणि तारीख खान असे या दरोडेखोरांची नावे आहेत. या दोघांनी एनआरसी नावाच्या कंपनीच्या वतीने देशातील एटीएम मशीन 5 सेकंदांसाठी हॅक करण्याची युक्ती शिकली होती.

हे दोन्ही एनआरसी कंपनीच्या एटीएम मशीनचे लोकेशन काढून एटीएम आणि बँक हॅक करून एटीएम मशीनमधून लाखो रुपये काढून घ्यायचे. जेव्हा हे दोन्ही बँक आणि एटीएमला हॅक करुन फक्त 5 सेकंदांत लाखो रुपयांचीचोरी करायचे, तेव्हा याबाबत कुणालाच काही कळत नव्हते. इतकेच काय तर अगदी बँक स्टेटमेंटमध्येही हा व्यवहार दिसत नव्हता.

नेहमीप्रमाणे या वेळीही आरोपींनी एनआरसी नावाच्या कंपनीच्या एटीएम मशीनचे लोकेशन काढले. हे लोकेशन मुंबईतील एका अभ्युदय बँकेचे एटीएम होते. आरोपींनी ते हॅक करून पैसेही काढले. मात्र, यावेळी या चोरट्यांचा डाव फसला आणि याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्यांना कारनाम्यांमुळे अटक करून तुरुंगात टाकले.

हेही वाचा  - जीवापाड प्रेमात झाली मनोरूग्ण, 17 महिन्यांपर्यंत मृतदेहाची सेवा; दररोज नमस्कार करून ड्यूटीवर जात होती बँक मॅनेजर पत्नी

या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची दोघांची चौकशी केली असता त्यांच्या गुन्ह्यांची यादी समोर आली. आतापर्यंत या लोकांनी या अनोख्या पद्धतीने अनेक एटीएममधून लाखो रुपये काढल्याची माहिती समोर आली आहे. आता पोलीस त्यांनी कुठे कुठे याप्रकारे लाखो रुपयांची लूट केली आहे, याचा तपास करत आहे.

First published:

Tags: Crime news, Cyber crime